आत्ताच्या घडामोडी

चित्रपटसृष्टी पुन्हा हादरली! दिग्गज अभिनेत्रीचे निधन; बाथरूममध्ये आढळला संशयास्पद मृतदेह

हैद्राबाद | गेल्या काही दिवसापासून भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. 2022 या वर्षात अनेक दिग्गजांनी प्राणज्योत मावळली आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

जगाची गानकोकिळा म्हणून ओळखली जाणाऱ्या लता मंगेशकर यांच्या निधनाने देखील देश हळहळला आहे. त्यानंतर प्रसिध्द गायक सिद्धू मुसेवाला, केके, रमेश देव, बप्पी लहरी या सारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

त्यामुळे अभिनय क्षेत्राला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. चाहते जुन्या धक्क्यातून सावरत नाहीत तोपर्यंत नवीन कलाकाराच्या निधनाने हादरवून जात आहेत. त्यामुळे चाहते देवाकडे कलाकारांच्या आयुष्यासाठी आशीर्वाद मागताना पाहायला मिळत आहे.

 

सिनेविश्वाशी संबंधित आणखीन एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली असून अनेक व्यक्ती चिंतेत आहेत. प्रत्यूषा गरिमेला या प्रसिद्ध फॅशन डिझायनरचे त्यांच्या हैदराबाद येथील राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

मृत्यूची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी प्रत्यूषा त्यांच्या बाथरूममध्ये मृत अवस्थेत आढळून आल्या. अधिक माहिती अशी की, प्रत्यूषा यांचा सिक्युरिटी गार्ड शनिवारी त्यांच्या घरा बाहेर होता. त्याने अंदाज घेतला की, घरातून बराच वेळ झाला कोणत्याच हालचाली जाणवत नाहीयेत.

 

त्याला थोडी शंका वाटली त्यामुळे त्याने दार ठोठावले. मात्र घरातून काहीच प्रतिसाद येत नसल्याने त्याने तात्काळ पोलिसांना ही माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी प्रत्यूषा यांच्या घराचे दार तोडले. त्यावेळी प्रत्यूषा त्यांना बाथरूममध्ये मृत अवस्थेत सापडल्या.

 

घरात इतर गोष्टी देखील तपासण्यात आल्या. त्यावेळी पोलिसांना त्यांच्या बेडरूममध्ये कार्बन मोनोऑक्साइड सापडला आहे. हा संशयास्पद मृत्यू असल्याचे सांगत पोलिसांनी आता या विषयी अधिक तपास सुरू केला आहे. प्रत्यूषा एक मोठ्या फॅशन डिझायनर होत्या. त्यांनी अनेक मोठ मोठ्या सेलिब्रिटींसाठी फॅशन डिझायनरचे काम केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button