अभिनय क्षेत्राला लागली कोणाची नजर! आणखी एका प्रसिध्द अभिनेत्रीचे निधन; कला विश्वात शोककळा

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. २०२२ या वर्षात अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे.
यात लता मंगेशकर, बप्पी लहरी, रमेश देव, केके, सिद्धू मुसेवाला या सारख्या दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. यात विशेष म्हणजे लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर पूर्ण जगावर शोककळा पसरली होती.
यांच्या निधनाची बातमी ताजी असताना आणखी एका दिग्गजाने जगाचा निरोप घेतला आहे. प्रसिध्द डान्सर आणि अभिनेत्री शिला वाज यांचं निधन झाले आहे. शीला या एक वरिष्ठ अभिनेत्र्या होत्या. त्यांनी अनेक चित्रपटात काम करून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होत.
मात्र अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. शीला या जुन्या कलाकार होत्या. त्यांनी त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग बनविला होता.
त्यांनी १००हून अधिक चित्रपटात भूमिका साकारली होती. सुरुवातीला त्यांनी छोट्या चित्रपटांमध्ये काम केले, त्यानंतर त्यांना मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली आणि त्या हिंदी चित्रपट सृष्टीत झळकल्या.