भरत जाधवची मुलगी दिसते खुपचं सुंदर; करते ‘हे’ काम

मुंबई | भरत जाधवने मराठी सिनेसृष्टीत मोठं नाव कमावलं आहे. भरतचे बालपण लालबाग परळ येथील राजाराम स्टुडिओच्या अंगणात गेले. 3000 शो पूर्ण करणाऱ्या “ऑल द बेस्ट” या मराठी रंगभूमीवरील नाटकात अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर यांच्यासोबत अभिनय करताना भरत जाधव प्रसिद्ध झाला. नंतर त्याने ‘ सही रे सही ‘ या हिट मराठी नाटकात काम केले. जत्रा चित्रपटातील कोंबडी पळाली या गाण्यातील त्याच्या अभिनयाची चाहत्यांनी प्रशंसा केली.
भरतने आता पर्यंत 85 हून अधिक चित्रपट, 8 मालिकांमध्ये काम केले आहे आणि 8500 हून अधिक नाटक शोमध्ये सहभाग घेतला आहे. तो निर्माता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांचा जवळचा मित्र मानला जातो. भरत जाधवने त्याच्या अभिनय कारकिर्दीला 1985 मध्ये सुरुवात केली, त्यावेळी तो शाहीर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची लोकधारा नृत्य मंडळात सामील झाला होता. . ऑल द बेस्ट , सही रे सही आणि श्रीमंता दामोदर पंथमधील भूमिकांसाठी तो विशेष ओळखला जातो.
भरतने सुरुवातीला अनेक विनोदी भूमिका केल्या. त्याचा बकुळा नामदेव घोटाळे हा चित्रपट देखील खूप गाजला. या चित्रपटात त्याच्या बरोबर सिद्धर्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी या कलाकारांचा सहभाग होता. त्याने यामध्ये खलनायकाची भूमिका केली होती. भरत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांना त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगत असतो. त्याच्या परिवारातील देखील अनेक व्यक्तींचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
भरत जाधव यांच्या मुलीचे नाव सुरभी जाधव असे आहे. सुरभी ही अभिनय क्षेत्रापासून खूप दूर आहे. तिने वैद्यकीय शिक्षण घेतले असून ती एक डॉक्टर आहे. असे असले तरी ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे अनेक सुंदर फोटो ती चाहत्यांबरोबर शेअर करते. तिने एक फोटो जरी शेअर केला तरी त्याला तुफान लाइक्स मिळतात.