आत्ताच्या घडामोडी

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचं ठरलं लग्न? ‘या’ व्यक्ती सोबत घेणार सातफेरे

मुंबई |अभिनय क्षेत्रात सध्या लग्नसराई सुरू आहे. यंदा अनेक कलाकारांनी आपल्या जीवनातीला आयुष्यभरासाठी साथ देण्याच वचन दिलेलं आहे. अशात आता अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही देखील लग्नबंधनात अडकणार आहे. भाग्यश्रीला स्टायलिश जीवन जगायला फार आवडते. ती सोशल मीडियावर कायमच तिच्या जीवनातील वेगवेळ्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

 

अशात सध्या तिचं नाव विजय पालंडे बरोबर जोडलं जातं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती त्याला डेट करते. या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील केलं आहे. विजय हा एक मेकअप डिझाईनर आहे. आणि आता हे दोघं लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

भाग्यश्री आणि विजय दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. अशात आपल्या प्रेमाची कबुली स्वतः अभिनेत्रीने दिली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर विजय बरोबरचे काही फोटो पोस्ट केले होते. तिने आपल्या प्रियकराबरोबर फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “माझं प्रेम” तसेच तिने रेड हार्ट ईमोजी देखील शेअर केले होते.

 

आता हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. यावर तिचे चाहते देखील खूप खुश आहेत. अनेक जण तिला कमेंट्समधून लग्नाविषयी वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. मात्र या बाबत त्यांनी अधिकृत घोषणा केली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button