बंगाली सिनेसृष्टीला लागली कुणाची नजर? सलग ३ अभिनेत्रीनंतर आणखी एका कलाकाराचा संशयास्पद मृत्यू

दिल्ली | सिनेसृष्टीला झालंय तरी काय? सलग तीन अभिनेत्रींच्या रहस्यमयी मृत्यूनंतर आता पुन्हा एका मॉडेलचा मृत्यू झाला आहे. बंगालमधील एका स्ट्रगलर मॉडेलने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे.

 

गेल्या १५ दिवसांमध्ये एकूण ३ अभिनेत्रींचा असाच रहस्यमयी मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अशात सरस्वती दास या स्ट्रगलर मॉडेलचा देखील मृत्यू झाल्याने सर्वत्र शोकाकुल वातावरण पसरलं आहे. सरस्वती कोलकत्ता येथे आपल्या आई बरोबर आजीच्या घरी राहत होती. काल म्हणजेच रविवार २९ मे रोजी ही दुःखद घटना घडली.

 

नेहमी प्रमाणे सरस्वती आपल्या आई आणि आजी बरोबर झोपली होती. रात्री २ च्या सुमारास आजीला अचानक जाग आली. आजीने पाहिलं की, सरस्वती कुठे दिसत नाही. त्यामुळे आजी तिला शोधत तिच्या खोलीत गेली. तिथे गेल्यावर आजीच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या खोलीत सरस्वतीचे शरीर एका दोरीला लटकले होते.

 

सरस्वतीने गळफास घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अशात तिच्या आतम्हात्ये मागे कोणते कारण असावे असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. यावर तिच्या कुटुंबियांकडून असं सांगण्यात आलं आहे की, “प्रेम प्रकरणात अपयश आल्याने ती बऱ्याच दिवसांपासून तणावात होती. त्यामुळेच तिने असं टोकाचं पाऊल उचललं आहे.”

 

सरस्वती प्रमाणेच बिदिशा मजुमदार, मंजुषा नियोगी आणि पल्लवी डे या अभिनेत्रींनी देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सध्या पोलीस सरस्वतीच्या मृत्यूचे आणखीन काही धागे दोरे मिळत आहेत का या शोधत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button