आत्ताच्या घडामोडी

बॉलीवूड हादरलं! १००हून अधिक चित्रपटाची निर्मिती केलेल्या दिग्दर्शकाचे निधन; अभिनेते म्हणून देखील गाजवली कारकीर्द

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत, यामुळे 2022 हे वर्ष अभिनय क्षेत्रातील व्यक्तींसाठी घातक मानलं जात आहे. या वर्षात अनेक तारे निखळले आहेत.

 

त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी, केके या सारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे. यांच्या दुःखातून सावरत असताना आणखी एका दिग्गजांची प्राणज्योत मावळली आहे.

 

प्रसिद्ध दिग्दर्शक तरुण मजुमदार यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या लाखो चाहत्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तरुण हे वरिष्ठ दिग्दर्शक म्हणून ओळखले जायचे.

 

काही काळी छोट्या पडद्यावर धुमाकूळ घातलेल्या बालिका वधू या मालिकेचे देखील त्यांनी दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे अचानक त्यांच्या जाण्याने बालिका वधुंच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ते एक दिग्दर्शकच नाही तर ते एक अभिनेते देखील होते.

 

त्यांनी देखील काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी मल्टीप्ल ऑर्गन मॉलफंगशन एलिमेंट नावाचा घातक आजार झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती बिघडत गेली.

 

आणि अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांना कोलकत्ता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अनेक दिवस उपचार करण्यात आले मात्र ते अपयशी ठरले. अखेर त्यांची प्राणज्योत मावळली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button