Breaking | राज्यमंत्री बच्चू कडू अडचणीत येण्याची शक्यता? वाचा नेमकं प्रकरण

अकोला | कायम शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन अधिवेशनात खळबळ उडवून देणारे तसेच निर्भिड शेतकरी नेते म्हणून ओळखले जाणारे राज्यमंत्री बच्चू कडू अडचणीच्या भोवऱ्यात सापडले असल्याचे दिसत आहे. त्यांच्यावर 1 कोटी 95 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Join WhatsApp Group

 

पदाचा गैरवापर करून परस्पर कागदपत्रात फेरफार करून त्यांनी तब्बल 1 कोटी 95 लाख रुपयांचा अपहार केला असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीने केली आहे. कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे कडू हे अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

अकोला परिषदेकडून जिल्हा नियोजित समितीकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये त्यांनी फेरफार करून 1 कोटी 95 लाख रूपयांचा अपहार केला असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. या प्रश्नांवर बच्चू कडू यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच अद्याप त्यांनी आत्तापर्यंत त्यांनी याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

Related Articles

One Comment

  1. बच्चू कडू ऊनपर झुटा आरोप लगाया जा रहा है बच्चू कडू अच्छे आदमी है ऐसा गलत काम कभी कर नही सकते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button