ज्याला आपण समजत होतो छोटा अभिनेता, तो निघाला बच्चन कुटुंबाचा जावई

दिल्ली | बॉलिवूड हे सिनेसृष्टीतील एक असं ठिकाण आहे ज्याच्या झगमगीपासून कोणीच लांब राहू शकत नाही. मात्र या इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक गुपित आहेत जी पडद्यावर दिसत जरी असली तरी आपल्याला त्यांची खरी माहिती नसते. या बातमीतून बॉलिवूडमधील अशीच एक गोष्ट जाणून घेणार आहोत. जी आता पर्यंत तुम्हाला ठाऊक नाहीये.

 

बिग बी आणि अभिनयाने भरलेलं त्यांचं घराण हे आपल्या सर्वांनाच परिचयाचं आहे. बच्चन कुटुंबातील सर्वच कलाकारांना तुम्ही ओळखत असाल. मात्र या कुटुंबात असा एक कलाकार आहे जो कधीच जास्त मीडिया समोर आलेला नाही.

 

विशेष म्हणजे अजून पर्यंत हे कुणालाच माहिती नाही की, तो अमिताभ बच्चन यांच्या जवळचा आहे. जवळचा म्हणण्या पेक्षा तो त्यांचा नातेवाईकच आहे. त्याने बॉलिवूडमध्ये अवघ्या काही चित्रपटांमध्येच काम केलं आहे.

 

त्याला आजवर सर्व जण एक साधा अभिनेता समजत होते. मात्र तो कुणी साधा सुधा नसून बच्चन कुटुंबाचा जावई आहे. कुणाल कपूर असं त्या अभिनेत्याचं नाव आहे. आणि तो अमिताभ बच्चन यांचा जावई आहे.

 

अमिताभ बच्चन यांचा भाऊ अजिताभ बच्चन यांची मुलगी नैना बच्चनचा तो पती आहे. म्हणजे अमिताभ बच्चन यांचा तो पुतण्या जावई आहे. त्याने बॉलिवूडमध्ये खूप कमी चित्रपटांत काम केलं.

 

मात्र त्याचे बरेचसे चित्रपट हे हिट झाले आहेत. साल २००६ आली आलेला रंग दे बसंती हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर त्याने हॅट्रिक, आजा नचले, बचना ये हसिनो, डॉन २, गोल्ड अशा काही चित्रपटांमध्ये अभिनय साकारला. तसेच विराम या चित्रपटातील त्याच्या उत्तम कामगिरीसाठी त्याला पुरस्कार देखील मिळालेला आहे.

 

साल २०१५ मध्ये त्याने नैना बच्चनबरोबर लग्न केलं. त्या आधी दोन वर्षे हे दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी सोशल मीडियावर या दोघांच्या अफेअरची खूप चर्चा रंगली होती.

 

तर आता पर्यंत आपण सर्व या अभिनेत्याला एखादा साधा अभिनेता पाहत होतो. मात्र त्याच खरं सत्य आज सर्वांसमोर आलं आहे. नैना आणि कुणाल या दोघांना एक बाळ देखील आहे. नैना एका बँकेत गुंतवणूक दार आहे. ती अभिनयापासून खूप दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button