आत्ताच्या घडामोडी

बच्चन कुटुंबावर दुःखाचा डोंगर! अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन, अभिषेक हळहळला

दिल्ली | सध्या कान्स देशामध्ये फिल्म फेस्टीवल सुरू आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि इतर देशातील दिग्गज सेलिब्रिटी या फेस्टीवल साठी कान्स मध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आनंदाचे वातावरण बनले आहे. यात ऐश्वर्या आणि अभिषेक ने देखील सहभाग घेतला होता.

 

या फेस्टीवल मध्ये जगातील लोकप्रिय सेलिब्रिटींचे ऐश्वर्या कडे विशेष लक्ष होते. यात अभिषेक ने देखील धमाल केल्याचे सांगितले जातं आहे. मात्र अचानक घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे बच्चन कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.

 

अमिताभ बच्चन आणि बच्चन कुटुंबाच्या अत्यंत जवळ असलेल्या एका व्यक्तीचे निधन झाले आहे. त्यामुळे अभिषेक हळहळला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

कान्स वरून परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या अत्यंत जवळ असलेले, कॉस्च्युम डिझायनर अकबर शहापुरवाला यांचे निधन झाले आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अमिताभ यांच्या अत्यंत जवळ मानले जात होते.

 

विशेष म्हणजे शहापुरवाला यांनी अमिताभ बच्चन यांचे सर्व सुट शिवले होते. त्यांच्या अचानक जाण्याने अमिताभ बच्चन यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच अभिषेक याने सोशल मीडियावर पोस्ट लिहली आहे.

 

त्यात तो फार दुःखी झाला आहे. तो पोस्ट लिहीत म्हणाला की, अंकल यांनी माझा पहिला पोशाख शिवला होता. तो सूट अजून देखील आहे. आज रात्री मी त्यांचा सूट घालेल, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी पोस्ट त्याने लीहली आहे.

 

फक्त बच्चन कुटुंब नव्हे तर अनेक दिग्गजांचे सूट त्यांनी शिवले आहेत. ते एक प्रसिध्द डिझाईनर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button