अतुल कुलकर्णी यांची पत्नी दिसते खूपचं सुंदर; करते ‘हे’ काम?

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील एक अफलातून कलाकार अतुल कुलकर्णी तुम्हाला माहीतच असेल. त्यांनी अनेक चित्रपटांत काम करून लाखो रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका साकारली आहे. सुरुवातीला त्यांनी नाटकात काम करून रसिकांचे मनोरंजन केले, त्यानंतर त्यांना छोट्या पडद्यावर काम मिळू लागले.

 

आणि ते रसिकांच्या मनात झळकू लागले. त्यानंतर त्यांना मोठ्या चित्रपटात काम मिळू लागले आणि ते स्टार बनले, रसिकांच्या मनावर राज्य करण्यासाठी त्यांना अनेक दिवसांचा कालावधी लागला. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक वर्ष कला विश्वासाठी घालविली आहेत.

 

त्यांना खरी पसंती नटरंग या चित्रपटातून मिळाली. त्यांना त्या चित्रपटात मुख्य भूमिका देण्यात आली होती. नटरंग चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यांनी द अटॅक ऑफ 26/11, जंगली, प्रेमाची गोष्ट, सत्ता, चांदणी बार, नटरंग या प्रमुख चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे.

 

त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींची माहिती त्यांच्या चाहत्यांना नाही. त्यामुळे नव नव गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी सांगणार आहे.

 

त्यांच्या पत्नीचे नाव गीतांजली आहे. अतुल आणि गीतांजली यांचा प्रेम विवाह आहे. एके दिवशी त्यांची भेट झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि विवाह करण्याचे ठरविले. त्यांनी विवाह केला.

 

काही वर्षांपुर्वी रिलीज झालेला कोर्ट हा चित्रपट गीतांजली यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. कारण त्या चित्रपटांत त्यांनी वकिलाची भूमिका साकारली होती. कोर्ट हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेला.

 

गीतांजली एक अभिनेत्री म्हणून काम पाहतात. सध्या त्या OTT प्लॅटफॉर्म वरील वेब सिरीज मध्ये काम करतात. सध्या त्या छोट्या पडद्यावर काम करतात. येत्या काळात त्या मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button