भारत

देश हादरला! आणखी एका भारत मातेच्या सुपुत्राला वीरमरण; महाराष्ट्रावर शोककळा

जळगाव | आणखी एका सैन्यातील जवानाला वीरमरण आल्याने पूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील भातखंडे येथील जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील यांना वीरमरण आले आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा सोबत राज्यावर शोककळा पसरली आहे.

 

पाटील हे २००३ मध्ये नाशिक सैन्यात भरती झाले होते. त्यानंतर त्यांनी बिकानेर, लडाख या सारख्या जागांवर देश सेवा केली. मात्र अचानक त्यांच्या मृत्युने एक वरिष्ठ जवान शहीद झाल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पार्थिवास शासकीय इसमात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

 

पाटील हे युनिट बिकानेर ते आगरतळा या ठिकाणी रेल्वे प्रवासातून जात असताना, अचानक त्यांची तब्येत बिघडली. गोरखपुर रेल्वे जवळ त्यांची तब्येत खूपच बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

मात्र डॉक्टरांनी अतोनात प्रयत्न केले तरी अखेर त्यांची प्राणज्योत मावळली आहे. अनेक दिग्गजांनी पाटील यांच्या परिवारातील सदस्यांना भेटून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे. पाटील यांचे कुटुंब मोठे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button