खूप प्रयत्न केले पण बाप होऊ शकले नाहीत अनुपम खेर; धक्कायदाक कारण आले समोर

दिल्ली | बॉलिवूड कपल पैकी किरण खेर आणि अनुपम खेर हे एक बेस्ट कपल मानल जातं. या दोघांनी आपल्या आयुष्यात प्रत्येक प्रसंगी एकमेकांना साथ दिली आहे. अशात किरण खेर यांनी एका मुखतीत अनुपम यांच्याविषयी मोठा खुलासा केला होता.
किरण या बॉलिवूडच्या एक दिग्गज अभनेत्री आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक हिट चित्रपट या सिनेसृष्टीला दिले आहेत. अशात त्यांना कॅन्सर देखील झाला होता. एवढ्या मोठ्या आजाराला देखील त्यांनी जिद्दीने हाणून पाडलं होत.
अनुपम आणि किरण हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. पण त्यांच्या दोघांच्या नात्यात त्यांना हवा असलेला तिसरा पाहुणा कधीच येऊ शकला नाही. याची दोघांनाही खंत वाटते.
किरण आणि अनुपम या दोघांचा हा दुसरा विवाह आहे. या आधी किरण यांचे लग्न व्यवसायिक गौतम बैर यांच्याशी झाले होते. या दोघांचं नात अवघे ६ महिने टिकलं. अशात या दोघांना एक मुलगा देखील झाला. त्याचं नाव सिकंदर आहे.
गौतम आणि किरण यांचा घटस्फोट झाला तेव्हा किरण सिकंदरला स्वतः कडे घेऊन आल्या. कारण सिकंदर त्या वेळी खूपच लहान होता. किरण आणि अनुपम यांना देखील एक मूल हवं होतं. त्या साठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र ते अपयशी ठरले.
किरण यांनी एका मुलाखतीत स्वतः याविषयी सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, ” अनुपम सिकंदरवर खूप प्रेम करतात. त्याला जीव लावतात. त्यांना देखील स्वतः च मुलं हवं होतं. आम्ही अनेक डॉक्टरांचे सल्ले देखील घेतले. मात्र आम्हाला मुलं झालं नाही. आम्हाला नेहमी वाटायचं सिकंदरला एक भाऊ किंवा एक बहीण असावी मात्र तस कधीच होऊ शकल नाही.”
अनुपम यांनी देखील एका मुलाखतीत बाप होऊ न शकल्याच दुःख व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते की , ” सिकंदर माझा मुलगा आहेच. पण मला स्वतः च बाळ देखील पाहिजे होत. किरण आणि माझं बाळ नसल्याचं मला फार दुःख आणि खंत आहे.”
अशात अनुपम यांचा देखील हा दुसरा विवाह होता. त्यांनी या आधी घरच्यांच्या म्हणण्यानुसार एक विवाह केला होता. त्यांच्या पत्नीचे नाव मधुमालती असे होते. साल १९७९ मध्ये मधुमालती आणि अनुपम यांचा विवाह झाला होता. पहिल्या पत्नीकडून देखील त्यांना एकही मुलं नव्हतं.
किरण आणि अनुपम यांनी आपल्या आयुष्यातला भूतकाळ मागे सरत नवीन संसाराला सुरुवात केली. अजूनही ते दोघे एकत्र एक मेकांना साथ देत आहेत.