मराठमोळ्या अंकुश चौधरीची पत्नी पाहीलीत का? दिसते खुपचं सुंदर; करते ‘हे’ काम

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीत अनेक दिग्गज कलाकार येऊन गेले. काही जण जास्त वेळ टिकले तर काहींनी हिंदी चित्रपट सृष्टीची वाट धरली, मराठी चित्रपट सृष्टीने राष्ट्रीय चित्रपट सृष्टीला देखील अनेक कलाकार दिले आहेत.

 

असाच एक उकृष्ट कलाकार अंकुश चौधरी तुम्हाला माहीतच असेल. त्याने दुनियादारी या चित्रपटात दिग्या या पात्राची भूमिका साकारून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यानंतर त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत.

Advertisement

 

अंकुश चौधरी याला अत्यंत लहान वयापासून अभिनय क्षेत्राचां लळा होता. त्यानंतर त्याने कला विश्वात काम करण्याचे ठरविले आणि पाऊल टाकले, सध्या तो एका उंच शिखरावर जाऊन पोहचला आहे. त्याचे लाखोंच्या संख्येत चाहते निर्माण झाले आहेत.

Advertisement

 

त्याच्या खासगी आयुष्या बाबत फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्याच्या खासगी आयुष्यातील काही माहिती सांगणार आहे. अंकुश चौधरी यांच्या पत्नीचे नाव दीपा परब असे आहे. दीपा ही देखील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे.

 

मात्र ती मराठी चित्रपट सृष्टीतील नसून हिंदी चित्रपट सृष्टीत सक्रिय आहे. तिने अनेक मालिकांमध्ये देखील भूमिका साकारली आहे. सध्या ती मराठी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकताना पाहायला मिळत आहे. येत्या १५ ऑगस्ट पासून ती छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

 

म्हणजेच झी मराठी वरील मन उडू उडू झालं ही मालिका निरोप घेणार आहे. आणि त्याच्या जागेवर ही “तू चाल पुढं” ही मालिका सुरू होणार आहे. यात दीपा ही मुख्य पात्र साकारताना पाहायला मिळणार आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *