Fact Check | अनिता दातेच निधन झालंय का? हार घातलेली फोटो व्हायरल; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

पुणे | झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अनिता दाते सध्या भलत्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या एका फोटोची तुफान चर्चा सुरू आहे.
तिचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोत तिला हार घातल्याचे दिसत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिचा मृत्यू झाल्यामुळे हा हार घालण्यात आला आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
सध्या तिच्या चाहत्यांमध्ये अत्यंत चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनिता दातेने अत्यंत मेहनतीवर कलाविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेमुळे ती अत्यंत प्रकाश झोतात आली आहे.
येत्या काळात देखील ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. माञ सध्या तिचा व्हायरल होत असलेला फोटो खुद्द तिने तिच्या सोशल मीडिया खात्यावर पोस्ट केला आहे. सध्या ती सुखरूप आहे. मात्र हा फोटो तिने का व्हायरल केला आहे. याच अद्याप कारण समजू शकले नाही.
मात्र तिच्या चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र कोणीही मनात काहीही विचार आणू नयेत. अनिता सुखरूप आहे. असे आवाहन केले जात आहे. मात्र हा फोटो अनिताने का शेअर केला याच उत्तर तिला द्यावं लागणार आहे.