आत्ताच्या घडामोडीमनोरंजन

फोटोत दिसत असलेला हा चिमुकला आता करतोय चित्रपट सृष्टीवर राज्य; ओळखा पाहू

दिल्ली | सोशल मीडियावर सध्या बॉलीवूड कलाकारांचे अनेक बालपणीचे फोटो व्हायरल होतं आहेत. अशात आता यात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकार देखील सामील झाले आहेत. अनेक कलाकार त्यांचे बालपणीचे फोटो शेअर करत आहेत. त्यामुळे चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराला ओळखण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.

 

सध्या साऊथ इंडस्ट्री बॉलीवूडवर भारी पडत असलेली दिसते. कारण साऊथमध्ये चित्रपटांची असलेली कथा आणि तिथले कलाकार. यांमुळे ही इंडस्ट्री खूप नाव कमवत आहे. नुकताच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक टिन एज असलेला मुलगा आहे. हा मुलगा मस्त स्माईल देत पोज मध्ये उभा आहे.

 

अनेक व्यक्ती याला ओळखण्यात अजूनही असर्थ ठरले आहेत. तर अजून तुम्हीही त्याला ओळखले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा मुलगा आल्लू अर्जुन आहे. सध्या त्याने आपल्या दमदार अभिनयाने साऊथमध्ये नुसता धुमाकुळ घातला आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा फोटो त्यानेच काही वर्षांपूर्वी शेअर केला होता.

 

नुकताच त्याचा पुष्पा हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेत्री रश्मीकाने त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. यातील त्याचा डान्स आणि स्वॅग चाहत्यांना खूप आवडला. त्यामुळे सध्या त्याची मोठी चर्चा सुरू आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी तुफान लाइक्सचा वर्षाव केला आहे.

 

अल्लू अर्जुनचा जन्म 8 एप्रिल 1982 रोजी मद्रास (सध्याचे चेन्नई ) येथील एका तेलगू कुटुंबात चित्रपट निर्माता अल्लू अरविंद आणि निर्मला यांच्या घरी झाला. त्याचे आजोबा प्रख्यात चित्रपट कॉमेडियन अल्लू रामलिंगय्या होते जे 1000 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसले. त्याचे मूळ ठिकाण आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील पलाकोल्लू आहे . अल्लू अर्जुन चेन्नईमध्ये वाढला आणि त्यांचे कुटुंब २० च्या दशकात हैदराबादला गेले.

 

अल्लू अर्जुनने साल 2003 मध्ये गंगोत्रीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले . सुकुमारच्या कल्ट क्लासिक आर्या ( 2004) मध्ये अभिनय करून तो प्रसिद्ध झाला , ज्यासाठी त्याला नंदी स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला . त्याने बनी (२००५) आणि देसमुदुरु (२००७) या अॅक्शन चित्रपटांसह आपली प्रतिष्ठा मजबूत केली . 2008 मध्ये, त्याने पारुगु या रोमँटिक नाटकात काम केले, ज्यासाठी त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. आता पर्यंत त्याने साऊथ चित्रपट सृष्टीत मोलाची कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button