आत्ताच्या घडामोडी

अरेच्चा! लग्नाला अजून वर्षही नाही झालं, तर रणबीरने केलं या अभिनेत्रीला प्रपोज….

दिल्ली | आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांची जोडी अनेक चाहत्यांची फेवरेट जोडी आहे. या दोघांच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अशात सोशल मीडियावर रणबीरचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतं आहे. यामध्ये तो दोन्ही गुढग्यावर बसत एका मुलीला प्रपोज करताना दिसतो आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आणि चाहत्यांच्या मनात प्रश्नाचं काहूर उठलं आहे.

 

अनेक जण म्हणत आहेत की, रणबीर असं कसं काय करू शकतो? त्याच आणि आलियाच आताच लग्न झालं आहे? लग्नाला अजून एक वर्ष झालं नाही तर रणबीर दुसऱ्या मुलीवर प्रेम करतोय की काय? असे प्रश्न त्याला विचारण्यात येत आहेत. आता तुमच्या मनात देखील असे प्रश्न आले असतील तर जरा थांबा. या व्हिडीओ मागचं खरं सत्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

तर त्यांचं झालं असं की, अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि रणबीर लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यासाठी ते कॅनडा येथे या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. व्हायरल होतं असलेला व्हिडिओ त्यांच्या याच आगामी चित्रपटाटला आहे. कॅनडामधील एका सार्वजनिक ठिकाणी या चित्रपटाचं शुटींग झालं आहे.

 

शुटींग वेळी अनेक व्यक्तींनी इथे गर्दी केली होती. त्यातीलच एकाने या शूटिंगचा एक व्हिडिओ शूट केला आणि तो रणबीर कपूर फॅन्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. त्याने हा व्हिडिओ पोस्ट करत रणबीर आणि आलियाला देखील टॅग केलं आहे.

 

अशात आता अनेक युजर्स यावर आलियाची प्रतिक्रिया जाणून घेण्यात उत्सुक आहेत. श्रद्धा आणि रणबीरच्या या आगामी चित्रपटाचं नाव अद्याप समजलेलं नाही. तर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा या चित्रपटातील एका गाण्याचा आहे. यामध्ये श्रद्धा खूप सुंदर दिसत आहे.

 

श्रद्धा आणि रणबीर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. तसेच गाण्याविषयी बोलायचे झाल्यास त्या व्हिडिओमधून चाहत्यांनी हे गाणं आर्जित सिंगने गायलं आहे हे देखील ओळखलं आहे. गाण्यात रणबीर आलियाला प्रपोज करतो आहे. त्यांचा हा आगामी चित्रपट कॉमेडी आणि लव स्टोरीवर आधारित आहे.

 

रणबीर आणि श्रद्धा हे दोघेही बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार आहेत. रणबीर त्याच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये देखील व्यस्त आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन हे दोघेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ९ सप्टेंबर रोजी त्याचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button