लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच आलिया भट्ट प्रेग्नेंट; स्वतःच दिली खुशखबर

दिल्ली | बॉलिवूड कपलच्या लग्नाप्रमाणे त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या बाकीच्या गोष्टी देखील चाहत्यांना माहीत करून घ्यायला खूप आवडते. अशात नुकतेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. तर आता त्यांच्याकडे एक मोठी गोड बातमी आहे.

 

आलियाने स्वतः ही गोड बातमी तिच्या चाहत्यांना दिलेली आहे. तिने तिच्या इनस्टाग्राम अकाऊंट वरुण ही माहिती दिली आहे. तिने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये आलिया आणि रणबीर दोघेही हॉस्पिटलमध्ये दिसत आहेत. एथे ते सोनोग्राफी साठी आलेले आहेत. समोर एका स्क्रीनवर हार्ट इमोजी दिसतो आहे.

Advertisement

 

हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिल आहे की, ‘आमच बाळ लवकरच येत आहे.’ त्यामुळे आता सोशल मिडियावर या दोघांच्या बाळाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Advertisement

 

अनेक चाहते आणि कलाकार त्यांना बाळासाठी शुभेच्छा देत आहेत. आता पर्यंत परिणीती चोप्रा, टायगर श्रोफ, प्रियंका चोप्रा, मौनी रॉय, करण जोहर आशा अनेक कलाकारांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *