अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी अत्यंत दुःखत बातमी

दिल्ली | बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या चिंताजनक परिस्थितीत आहे. आपल्या नवीन चित्रपटाला घेऊन तो सध्या चिंतेत आहे. नुकताच त्याचा सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जो तिकीटबारीवर फ्लॉप ठरण्याची शक्यता आहे.

 

अक्षय कुमारचा हा चित्रपट ३ जून रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. अशात चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याला वादाचा सामना करावा लागला. ज्यामुळे निर्मात्यांना या चित्रपटाचं नाव देखील बदलाव लागलं.

 

अशात या चित्रपटावर अनेक राज्यांमध्ये बंदी देखील घातली गेली. त्यामुळे चित्रपटाचे आधीच मोठे नुकसान झाले. चित्रपटाचं बुकिंग देखील फारस न झाल्याने अक्षय चिंतेने ग्रासला आहे.

 

अशात नुकताच कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा भूलभुलैया २ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्याने कंगना राणावतचा चित्रपट फ्लॉप ठरला. अशात आता हा चित्रपट अक्षयच्या सम्राट पृथ्वीराज ला देखील टक्कर देऊ पाहत आहे.

 

भूलभुलैया २ प्रदर्शित होण्याआधी सम्राट पृथ्वीराज चित्रपटाची चांगली बुकिंग झाली होती. एकूण ३० हजार तिकीट या वेळी विकली गेली होती. मात्र भूलभुलैया २ प्रदर्शित झाल्यानंतर सम्राट पृथ्वीराज चित्रपटाची विक्री कमी झाली. या मुळे सम्राट पृथ्वीराजची फक्त १० हजार तिकीट विकली गेली आहेत.

 

आता पुढे हा चित्रपट किती कमाई करू शकेल हे सांगता येणार नाही. मात्र कमाई कमी झाल्यास हा चित्रपट देखील फ्लॉप ठरण्याची शक्यता आहे. अशात अक्षयचा बच्चन पांडे हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला होता. अशात आता सम्राट पृथ्वीराज देखील त्याच वाटचालीवर आहे. सलग २ चित्रपट फ्लॉप ठरल्यास अक्षयचे कोट्यावधींचे नुकसान होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button