अक्षय कुमार करणार राजकरणात प्रवेश?

मुंबई | बॉलिवूड स्टार अक्षय कुमार कायम कोणत्या न कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असतो. सध्या देखील सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. याच कारण म्हणजे तो भविष्यात राजकरणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अक्षय कुमार याने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्याचा वेगळा चाहता वर्ग बनला आहे. तो विमल सुपारी या कंपनीची जाहिरात केल्या मुळे गेल्या काही दिवसांपूर्वी चांगलाच अडचणीत सापडला होता.
Advertisement
एका कार्यक्रमाच्या दरम्यान अक्षय कुमारला एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला, येत्या काळात तुम्ही राजकारणात प्रवेश करणार का? तर यावर अक्षय कुमार म्हणाला, समाजासाठी जे शक्य आहे. ते करण्याचा प्रयत्न करणार, मात्र सध्या अभिनय क्षेत्रात मी खुश आहे.
Advertisement