स्पृहाचा पती दिसतो फारचं देखणा; करतोय ‘हे’ काम?

पुणे | मराठी फिल्म इंडस्ट्री मधील लोकप्रीय कलाकार स्पृहा जोशी तुम्हाला माहीतच असेल तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमधून येत चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. जोशी घराण्यातून येऊन मराठी चित्रपट सृष्टीत तिने स्वतःच मोठं नाव कमावलं आहे.

 

तिने झी मराठी वरील उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट या कार्यक्रमातून चाहत्यांचे मनोरंजन केले. तसेच सुर नवा ध्यास नवा या शो मध्ये देखील ती झळकली होती.

 

स्पृहाने पैसा पैसा, बाबा, प्रेम हे, मोरया, देवा या चित्रपटात काम करून रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. स्पृहाचे लाखो चाहते आहेत. तिच्या बद्दल जाणून घेण्याची अनेकांना मोठी उत्सुकता असते. मात्र तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे.

 

आज आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणजेच तिच्या पती विषयी माहिती जाणून घेणार आहोत. 2014 साली स्पृहाने वरद लघाटे यांच्याशी विवाह केला. वरद यांचा आणि अभिनय क्षेत्राचा काडीमात्र संबंध नाही.

 

मात्र तरी देखील त्यांनी एकमेकांसोबत विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला वरद हे एका लोकप्रिय दैनिकासाठी पत्रकार म्हणून काम पाहत होते. तसेच ते दिग्गज पत्रकार म्हणून देखील नावा रूपाला आले होते.

 

वरद आणि स्पृहा हे दोघे 6 वर्ष रिलेशनशिप मध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न केल्यानंतर वरद यांनी पत्रकारिता क्षेत्राला रामराम ठोकत मार्केटिंग क्षेत्रात प्रवेश केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button