दिग्गज अभिनेत्रीचा कार अपघात; अभिनय क्षेत्र हादरलं

मुंबई | ‘मराठी बिग बॉस ३’ फेम सोनाली पाटीलचा जीवघेणा अपघात झाला आहे. या अपघातामुळे तिच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता ती या धोक्यातून सावरली आहे.

 

सोनाली पाटीलचा अपघात झाल्यानंतर तेथील काही व्यक्तींनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं त्यामुळे तिचा जीव बचावला आहे. हा अपघात साधारण ३ ते ४ दिवस आधी झाला होता.

 

सोनालीने स्वतः या अपघाताची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंट मार्फत चाहत्यांना दिली आहे. तिच्या अपघाताची पोस्ट अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

 

सोनालीने सांगितले की, मी पुण्यातील चाकण हायवेवरील एका रस्त्यावरून जात होते. त्यावेळी तिथे भरदाव वेगाने एक गाडी आली. त्या गाडीचा मला खूप जोरात धक्का लागला. माझ्या उजव्या बाजूला हा धक्का इतका जोरात लागला की, मी रस्त्याच्या कडेला फेकली गेले.

 

यामध्ये माझ्या डोक्याला जबर मार लागला. मी तिथेच बेशुद्ध पडले. तेथील काही व्यक्तींनी मला उचलून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर माझ्यावर उपचार झाले.

 

यात डोक्याला मार लागल्याने मी कोमात जाण्याची शक्यता देखील सांगण्यात आली होती. मात्र तसं काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी मी शुद्धीत आले तेव्हा हा सर्व प्रकार मी माझ्या कुटुंबीयांना सांगितला.”

 

आता सोनालीची तब्येत आधी पेक्षा खूप बरी आहे. मात्र डोक्याला मार लागल्याने तिला थोडा त्रास जाणवतो आहे. सोनाली ही मूळची कोल्हापूर शहरातील आहे.

 

तिचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे कोल्हापूर येथेच पूर्ण झालं. त्यानंतर तिने अभिनयाकडे आपली झेप घेतली. २०१८ साली आलेल्या अरोन या चित्रपटात ती पहिल्यांदा झळकली होती. त्यानंतर जुळता जुळता जुळतय की या मालिकेत देखील तिने काम केलं. तसेच बिग बॉस ३ मध्ये ती खूप छान पद्धतीने खेळताना दिसली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button