बॉलिवूड हादरलं! ‘या’ अभिनेत्याच्या घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेते आणि कलाकारांचे निधन होताना पाहायला मिळत आहे. लता मंगेशकर, रमेश देव या सारख्या दिग्गज लोकप्रिय व्यक्तींवर काळाने घाला घातला आहे.

 

मात्र आत्ता पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बॉलिवूड अभिनेत्याच्या भावावर काळाने घाला घातला आहे. त्यामुळे पूर्ण बॉलिवूड मध्ये शोककळा पसरली आहे. रवी किशन शुक्ला यांचे बंधू रमेश किशन शुक्ला यांचे निधन झाले आहे.

 

ते गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र अचानक त्यांची तब्येत अधिकच बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मावळली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. रमेश यांना कर्करोग तसेच इतर आजार देखील होते.

 

शेवटच्या क्षणी त्यांची रोग प्रतिकारक क्षमता अत्यंत कमी झाली होती. त्यामुळे ते कर्करोगाशी लढू शकले नाहीत. अखेर त्यांनी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला आहे. ही बातमी समल्यावर शुक्ला परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर पसरला होता.

 

अभिनेता रवी शुक्ला यांना मानणारा वर्ग मोठा आहे. ही बातमी सोशल मीडियावर प्रसारित झाल्यावर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. रमेश यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज लोकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button