आत्ताच्या घडामोडी

‘या’ अभिनेत्याचां झाला खूपचं भयानक शेवट; मृत्यूचे कारण पाहून धक्काच बसेल

दिल्ली | भारतीय चित्रपट सृष्टीला व्हीलन पात्राची एक वेगळी ओळख आहे. चित्रपटांत गुंडाची भूमिका साकारणारा अभिनेता जर परफेक्ट असेल तर तो सिनेमा हिट होतो. जेवढे महत्त्व हिरोच्या भूमिकेला आहे. तेवढंच महत्त्व गुंडाच्या भूमिकेला देखील आहे.

 

अशीच गुंडाची भूमिका साकारणारे अभिनेते रामी रेड्डी यांच्या विषयी काही जाणून घेणार आहोत. रामी यांचा जन्म हैद्राबाद मध्ये झाला. त्यानंतर त्यांना लेखणीचे वेड लागले. त्यांनी पत्रकारितेचा कोर्स पूर्ण करून एका प्रसिध्द वृत्तपत्रात काम केलं.

 

त्यांनी अनेक वर्ष त्या दैनिकाला यशस्वी काम केले. त्यानंतर त्यांना चित्रपट सृष्टीचे वेड लागले आणि आणि अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. सुरुवातीच्या काळात हळूहळू त्यांना छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी संधी मिळाली.

 

छोट्या पडद्यावर जबरदस्त अभिनय करून त्यांना मोठ्या चित्रपटात काम मिळू लागले. आणि त्यांनी त्यांच्या करिअर मध्ये 300 हून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत काम पाहिले.

 

रामी यांनी त्यांच्या आयुष्यात खूप स्ट्रगल केले. त्यांनी अभिनय क्षेत्रासाठी खूप कष्ट केलं. आणि त्यानंतर त्यांना हे अफलातून यश मिळालं आहे. त्यांचं जीवन जेवढं सुखमय गेलं तेवढं त्यांचा मृत्यू गेला नाही. त्यांना अत्यंत भयानक पद्धतीने शेवटचा श्वास घ्यावा लागला.

 

रेड्डी यांना सुरुवातीला लिव्हर चां त्रास होऊ लागला. त्यानंतर लिव्हर खराब झाला. यातून ते कसेबसे सावरले आणि त्यांची किडनी फेल झाली. यात ते सावरू शकले नाहीत. त्यांचा शेवटही अत्यंत भयंकर झाला. त्यांच्या मृत्युने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button