अभिनेता प्रभास लवकरच करणार लग्न; ‘या’ अभिनेत्रीला बनवणार जीवनसाथी?

दिल्ली | दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभास हा आता लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. अनेक चाहते त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

बॉलिवूडचा बाहुबली त्याच्या पिळदार शरीरयष्टीने आणि अभिनयाने नेहमीच लाईमलाईटमध्ये राहिला आहे. अशात त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याने आजवर लाखोंचा चाहता वर्ग स्वतः कडे आकर्षित करून घेतला आहे.

 

तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांना सांगतो. तर आता त्याच्या लग्नाची ही गोड बातमी त्याने नाही पण त्यांच्या काकांनी दिली आहे.

 

रेडिओ मिरची ९ या चॅनल मार्फत त्यांनी या गोष्टीची घोषणा केली आहे. लवकरच प्रभास लग्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याच्या काकाचे नाव कृष्णम राजू असे आहे.

 

कृष्णम यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभासने आता पर्यंत तब्बल ६००० मागण्यांना नकार दिला आहे. अजूनही त्याला हवी तशी जीवनसाथी मिळाली नाही. त्यामुळे प्रभास आणि त्याचे कुटुंबीय एका गोड मुलीच्या शोधात होते.

 

त्याला पसंत पडेल अशी एक मुलगी आता सापडली आहे. मात्र या बाबत प्रभासने एकही घोषणा केलेली नाही. कृष्णम यांच्या मते त्याचे कुटुंबीय आणि तो लवकरच या गोष्टीची घोषणा करणार आहे.

 

त्याच्या काकांनी दिलेल्या या माहितीमुळे चाहते खूप खुश आहेत. प्रभास आता पर्यंत अनेकदा त्याच्या लग्नाच्या चर्चेत सोशल मीडियावर अडकलेला दिसला. अशात आता होणारी ही चर्चा लवकरच सत्यात उतरणार आहे.

 

प्रभासने आपल्या अभिनयाने आजवर दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडही चांगलच गाजवलं आहे. ईश्वर, राघवेंद्र, वर्षाम, चक्रम, छत्रपती, योगी, एक निरंजन, डार्लिंग, मिस्टर परफेक्ट, राधेश्याम अशा अनेक चित्रपटांत त्याने आजवर काम केले आहे. अशात लवकरच तो आदी पुरुष, सालार, प्रकल्प के या आगामी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button