आत्ताच्या घडामोडी

बॉलिवुड पुन्हा हादरलं! प्रसिध्द तरुण अभिनेत्रीचे निधन; कलाविश्वात शोककळा

मुंबई | 2022 हे वर्ष अभिनय क्षेत्रासाठी अत्यंत धक्कादायक जात असल्याचे दिसत आहे. या वर्षात अनेक दिग्गजांना जगाचा निरोप घ्यावा लागला आहे. तसेच अनेकांच्या आरोग्य संधर्भातील टेस्ट वेगळ्या प्रकारच्या आल्या आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्रासाठी हे वर्ष धोक्याच मानलं जातं आहे.

 

दिग्गज कलाकार आपल्याला या वर्षी सोडून गेले आहेत. यातील सर्वात मोठा धक्का आपल्याला लता मंगेशकर यांच्या रूपातून मिळाला, अनेक दिवस रुग्णालयात राहून देखील त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्याचं बरोबर जेष्ठ अभिनेते रमेश देव यांनी देखील जगाचा निरोप घेतला आहे.

 

तसेच संगीत सृष्टीशी निगडित असलेले बप्पी लहरी यांनी देखील जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दिग्गजांच्या निधनाच्या बातम्या ताज्या असताना आणखी एका दिग्गज अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे.

 

बंगाली टीव्ही मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसलेल्या पल्लवी देव या अभिनेत्रीने जगाचां निरोप घेतला आहे. अवघ्या 21व्या वर्षी तिने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगितलं जातं आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की,

 

पल्लवी ही बंगाली टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री होती. ती पोलिसांना तिच्या फ्लॅट मध्ये पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली, त्यानंतर तिचा मृतदेह पोलिसांनी काढून पीएम करण्यासाठी पाठवला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहिती नुसार पल्लवीने आत्महत्या केली आहे. दोरीने पंख्याला गळफास घेऊन तिने जीवन संपवलं आहे. तिच्या निधनाने बंगाली चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली आहे. तसेच ती नुकताच बॉलिवूड मध्ये देखील पदार्पण करणार होती.

 

मात्र त्यापूर्वी तिचे निधन झाल्याने बॉलिवूड ला देखील धक्का मानला जात आहे. तिच्या सहकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता. आत्महत्येच मोठं कारण नसल्याचं म्हटलं जात आहे. तसेच आम्हाला ती गेली असल्याचा आणखी विश्वास बसत नाही असेही तिचे सहकारी म्हणाले.

 

पल्लवीचां देखील चाहता वर्ग मोठा आहे. तिने रेशम झम्मी या मालिकेतून तिला खरी प्रसिद्धी मिळाली, त्यानंतर तिला अनेक मालिकांमध्ये काम मिळाले. त्यानंतर सध्या ती दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली होती. अनेकांनी तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button