आत्ताच्या घडामोडी

अभिनय क्षेत्र हादरलं! आणखी एका प्रसिध्द अभिनेत्रीची आत्महत्या; चित्रपट सृष्टीला झालंय तरी काय!

मुंबई | बॉलिवूड प्रमाणेच मालिका विश्व देखील आता मोठी झेप घेत आहे. अनेक अभिनेत्री आपल्या आभिनायाने आणि सुंदरतेने अगदी मोठ्या पडद्यावरील अभिनेत्रींना देखील टक्कर देऊ पाहत आहेत. अशात याच छोट्या पडद्यावरील एका मोठ्या अभिनेत्रीच्या आयुष्यात खूप मोठी दुर्घटना घडली आहे.

 

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एकदा तरी खरं प्रेम करतो आणि हे खर प्रेम जेव्हा धोका देतं तेव्हा होणाऱ्या वेदना ह्या त्या वयकतीलाच माहीत असतात. अशीच प्रेमाच्या विळख्यात असलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी जिने बालिका वधू ही मालिका खूप गाजवली. या अभिनेत्रीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

 

तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. खूप कमी वयात तिने आपल्या अभिनयाने मोठं नाव कमावलं होतं. मात्र एका व्यक्तीच्या ती प्रेमात पडली आणि याच प्रेमाने तिचा असा काही घात केला की, तिने हे जग सोडून जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या निधनाचा तो दिवस आठवला की, आजही अंगावर शहारे उभे राहतात. आजही चाहत्यांच्या मनात तिच्या आठवणी ताज्या आहेत. तर आता या अभिनेत्री प्रमाणे आणखीन एक हृदय हेलावणारी घटना घडली आहे.

 

ओडिसाची राजधानी असलेल्या भुवनेश्वर येथील ओडीसाई अभिनेत्री रश्मीरेखा हिने आपल्या आयुष्यात असाच एक मोठा निर्णय घेतला आणि कायमचं सर्वांना अलविदा केलं. रश्मीरेखाने देखील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांना ही माहिती कळताच ते घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

या प्रकारात तिचा बॉयफ्रेंड संतोष पात्रा याचा हात असल्याचे तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून त्या दोघांमध्ये वादाचे खटके उडत होते. अभिनेत्रीने आत्महत्या करताना आधी एक चिठ्ठी देखील लिहिली होती. ती चिठ्ठी सुद्धा पोलिसांच्या हाती लागली आहे.

 

रश्मीरेखा आणि संतोष हे गेल्या दीड महिन्यापासून एकमेकांबरोबर राहत होते. दिघे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होते. शनिवारी या दोघांमध्ये मोठी भांडण झाली. त्यामुळे संतोष घरातून निघून गेला. त्यानंतर बऱ्याच दिवसांपासून आपल्या मुलीबरोबर बोलण झाल नाही म्हणून शनिवारी अभिनेत्रीचे वडील तिला फोन करत होते. मात्र समोरून काहीच उत्तर मिळत नसल्याने ते खूप अस्वस्थ झाले. त्यांनी तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला.

 

या सर्वांत तिचा बॉयफ्रेंड शनिवारी जो घरातून निघून गेला होता तो सरळ दुसऱ्या दिवशी रविवारी घरी पोहचायला. घरी आल्यावर त्याने रश्मीरेखाला मृत अवस्थेत पाहिलं. त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तिचा फोन चेक केला तेव्हा त्यावर तिच्या वडिलांचे खूप फोन आलेले दिसले. त्यावेळी त्याने स्वतः अभिनेत्रीच्या वडिलांना ही दुखःद खबर सांगितली.

 

हा सर्व प्रकार समजल्यावर तिचे वडील आणि इतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस देखील इथे आले. नंतर अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी आमच्या मुलीच्या मृत्यूला तिचा बॉयफ्रेंड संतोष जबाबदार असल्याचं सांगितलं. आता या प्रकरणी पोलिसांना अद्याप ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यांचा अधिक तपास सुरू आहे. लवकरच ते संतोषला चौकशीसाठी बोलावणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button