आत्ताच्या घडामोडी

बॉलिवूड हादरलं! दोन प्रसिध्द अभिनेत्यांचा मृत्यू; अभिनय क्षेत्रात खळबळ

दिल्ली | प्रत्येक वेब सिरीजच्या कथा या रंजक आणि अनोख्या असतात. अशात नेटफ्लिक्सवरील वेब सिरिजची तर बातच और आहे. नेटफ्लिक्सवरील ” द चोजन वन” या वेब सिरीज बाबत एक दुःखद घटणा समोर आली आहे.

 

या सिरीजमधील काही कलाकारांचा मृतू झाला आहे. एका अपघातात यातील दोन कलाकारांचा मृत्यू झाल्याने कला क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेतली तेव्हा समजले की, एका कार अपघातात या सिरीजमधील दोन कलाकारांना आपला जीव गमवावा लागला.

 

या सिरीजची संपूर्ण टीम ही उत्तर पश्चिम मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्निया सूर द्वीपकल्प प्रदेशात, एकाच गाडीतून प्रवास करत होती. दरम्यान गाडी वाळवंटी प्रदेशात आली तेव्हा तिचा वेग जास्त होता. वाळवंट असल्याने वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुर्दैवी घटना घडली.

 

गाडीचा मोठा भीषण अपघात झाला. यात जागीच दोन कलाकारांचा मृत्यू झाला. तर गाडीत इतर ६ जणांना मोठी दुखापत झाल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

मृत झालेल्या कलाकारांची नावं जुआन फ्रान्सिस्को गोन्झालेझ आणि रायमुंडो गार्डुनो क्रूझ अशी आहेत. या दोघांच्या निधनाने सदर वेब सिरीजमधील सर्व टीम शोक व्यक्त करत आहे. तसेच सिने विश्वातील इतर व्यक्ती देखील भावूक झाले असून सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button