आत्ताच्या घडामोडी

चित्रपटसृष्टी पुन्हा हादरली! प्रसिध्द महिला कलाकाराचे निधन; अभिनय क्षेत्रात शोककळा

Entertainment | गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीतील काही तारे आपल्यापासून दूर गेल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. अशात रविवारी संगीत क्षेत्रातील एका सुप्रसिद्ध सुमधुर गायिकेने देखील या जगाचा निरोप घेतल्याची दुःखद बातमी समोर आली. तर आज या बातमीमधून ती गायिका नेमकी कोण आहे आणि तिचा जीवनप्रवास याविषयी जाणून घेऊ.

 

आपल्या सुरांनी अनेकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या पार्श्वगायिका संगीता साजिथ यांचे रविवार २२ मे रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. काही माध्यमांमधील वृत्तानुसार संगीता या किडनीच्या आजारे बऱ्याच दिवसांपासून त्रासल्या होत्या. उपचारासाठी त्या तिरुअनंतपुरम येथे त्यांच्या बहिणीच्या घरी राहत होत्या.

 

तेथेच त्यांच्या या आजारावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची या आजाराशी सुरू असलेली झुंज अयशस्वी ठरली आणि वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक चाहत्यांनी त्यांना सोशल मीडिया मार्फत श्रद्धांजली वाहिली. तसेच मोठ मोठ्या दिग्गज कलाकारांनी देखील माध्यमांद्वारे आपले दुःख व्यक्त केले. एवढेच नाही तर, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी देखील गायिकेच्या निधनात शोक व्यक्त केला.

 

संगीता साजिथ या एक पार्श्वगायिका होत्या. त्यांनी आपल्या कारकीर्दीत कन्नड, मल्याळम, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये अनेक गाणी गायली. दाक्षिणात्य सिनेसृष्टी त्यांनी आपल्या आवाजाने चांगलीच गाजवली होती. त्यांनी आजवर तब्बल २०० हून अधिक चित्रपटांची गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे त्या एआर रहमान, जॅक बिजॉय आणि कैथापरम दामोदरन नंबूथिरी या गायकांसाठी पार्श्वगायिका म्हणून काम करत होत्या. १९६४ साली जन्मलेल्या संगीता यांना लहानपापासूनच संगीताची आवड होती. त्यामुळे पुढे संगीतातचं करिअर करायचे असे त्यांनी ठरवले.

 

साल १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नलैया थेरापू’ या चित्रपटातून त्यांना पहिल्यांदा पार्श्वगायनाची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचं सोन करत त्यांनी या नंतर अनेक गाण्यांना आपला आवाज दिला. १९९० साली प्रभुदेवाचा ‘मिस्टर रोमिओ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये असलेलं ‘थन्नेराई कडालिकम’ हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं. हे गाणं संगीता यांनी गायलं होतं.

 

संगीता यांची दाक्षिणात्य संगीत क्षेत्रातील कारकीर्द फार मोठी आहे. त्यांचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. त्यांच्या अशा आकस्मित निधनाने चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. निधनानंतर चाहत्यांना त्यांचे निधन नेमके कोणत्या कारणाने झाले? असा प्रश्न पडला होता. त्यामुळे अनेक वृत्तांमधून त्यांचे निधन हे किडनीच्या आजारामुळे झाल्याचं समोर आलं. आज संगीता जरी आपल्यामध्ये नसल्या तरी, देखील त्यांचा आवाज कायमच अमर राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button