कृष्णा गहिवरला! रडत मागितली मामा गोविंदाची माफी

दिल्ली | कृष्णा अभिषेक आणि सुपरस्टार गोविंदा यांच्या मधील वाद हा सर्वांना माहीतच आहे. कृष्णा आणि त्याचा मामा गोविंदा यांचे नाते पूर्वी खूपच घट्ट होते. पण बदलत्या काळा नुसार व वाढत्या स्टारडम नुसार त्या दोघां मधील नाते खूपच दुरावले आहे. त्यात खूप मोठी दरी निर्माण झाली आहे.

 

त्या दोघां मधील वादाचे कारण हे कृष्णाची बायको कश्मिरा शहाही मानली जात आहे. मीडियामध्ये केलेल्या काही टिपण्णी नुसार हा वाद खूपच चिघळला आहे. कृष्णा अभिषेक सध्या द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातून दर्शकांच्या भेटीला दर शनिवार, रविवारी येत असतो.

 

यात त्याने खूप नावलौकिक मिळवले आहे. त्याच्या परफेक्ट विनोदी टाईमिंग मुळे तो लोकांला खूप हसवतो. गोविंदा पण त्याच्या आयुष्यात खूप खुश आहे. त्याचा शेवट चा सिनेमा रंगीला राजा या सिनेमातुन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तो 2019 ला रिलीज झाला होता.

 

त्याचा आगामी सिनेमा पार्टनर 2 यातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कृष्णा अभिषेक हा त्याचा मित्र व होस्ट मनीष पॉल याच्या शो मध्ये गेला होता. तेव्हा मनीष पॉलने प्रश्न विचारला कि तू गोविंदा मामा बद्दल काय बोलशील? तेव्हा कृष्णा अभिषेक म्हणाला चिची मामा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो मला तुमची खूप आठवण येते.

 

तुम्ही समाज माध्यमातून येणाऱ्या बातम्या वर जाऊ नका, माझी इच्छा आहे, कि माझी जी लहान मुले आहेत. त्यांना तुम्ही प्रेम कराव व त्यांच्या बरोबर खेळावं व मला माफ कराव. मनीष पॉल ने गोविंदाला त्याच्या शो मध्ये बोलावले होते.

 

तेव्हा गोविंदा म्हणाला कि माझी बहीण सुनीता आणि कृष्णा साठी माझ्या मनाचे दरवाजे उघडे आहेत. मी त्याला कधीपण माफ करू शकतो. व गोविंदा म्हणाला तुम्ही मला समोरासमोर भेटा तिथे बोला व आपण सर्व काही पाहिल्या सारख सुरुळीत करू. अशात हा वाद मिटल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button