आत्ताच्या घडामोडी

अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल, प्रकृती बाबत मोठी अपडेट

मुंबई | जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना दक्षिण मुंबई मधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार धर्मेंद्र यांना गेल्या काही दिवसांपूर्वी पासून पाठीचा त्रास सुरू झाला आहे. हा त्रास गंभीर स्वरूपात बदलला आहे. सध्या धर्मेंद्र यांची प्रकृती चांगली असल्याची अपडेट समोर आली आहे.

 

याबाबत रुग्णालयाला विचारले असता, त्यांनी याबाबत जास्त अपडेट दिली नाही. मात्र धर्मेंद्र यांना लवकर डिस्चार्ज मिळणार आहे. आणि सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळत आहे. धर्मेंद्र यांचं वय 86 वर्ष आहे.

 

धर्मेंद्र हे एक ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहते कमविले आहेत. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची माहिती समजल्यावर अनेक चाहत्यांना चिंता लागली आहे. तर अनेक दिग्गज रुग्णालयात भेटण्यासाठी गेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button