अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई | दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

 

मुंबई मधील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील विशेष डॉक्टर्स त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने चाहत्यांना आणि कला विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी देखील त्यांच्या प्रकृती बाबत धक्कादायक माहिती समोर आली होती. मात्र त्यावेळी काही तासातच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र आता त्यांची पुन्हा अचानक तब्येत बिघडल्याने चिंतेत भर पडली आहे.

 

धर्मेंद्र यांनी बॉलिवूड आणि हिंदी चित्रपट सृष्टीला एक वेगळं योगदान दिले आहे. त्यांनी शेकडो चित्रपटात काम करून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सध्या त्यांचं वय 86 वर्ष आहे. त्यांनी हिंदी सहित अनेक भाषांमध्ये अभिनय केला आहे.

 

रुग्णालयात त्यांना कशामुळे दाखल केले आहे. या बाबत अद्याप समजू शकले नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील समजत आहे. त्यामुळे काही वेळातच त्यांच्या प्रकृती बाबत माहिती येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button