आत्ताच्या घडामोडी

‘आई कुठे काय करते’ या मालिकेला आणखी एका दिग्गज कलाकाराचा रामराम; चाहत्यांना मोठा धक्का

मुंबई | आई कुठे काय करते ही मालिका खूप कमी कालावधीत घराघरात पोहचली. यामध्ये अरुंधती हे पात्र सर्वांना खूप आवडले. मात्र आता या मालिकेला उतरती कळा लागली आहे. अनेक कलाकार ही मालिका सोडून जाताना दिसत आहेत.

 

मालिकेला सतत एक वेगळे वळण लागताना दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता ही मालिका पाहून कंटाळले आहेत. अनेक जण मालिका बंद करा असं देखील म्हणत आहेत. मात्र निर्मात्यांनी कशीबशी ही मालिका सुरू ठेवली आहे. अशात आता यातील एक कलाकार ही मालिका सोडून गेला आहे.

 

काही दिवसांपूर्वी मालिकेत ईशाचा बॉयफ्रेंड सहील तिला सोडून जातो असं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे ईशा खूप दुखी होते. अनेक जण तिला समजावतात मात्र ती या प्रकरणामुळे खचून गेलेली असते.

 

अद्वैत कडणे हा या मालिकेत सहिल साळवी हे पात्र साकारतो, तर ईशा हे पात्र अभिनेत्री अपूर्वा गोरे साकारत आहे. अशात आता साहिल ईशाच्या आयुष्यातूनच नाही तर या मालिकेतून बाहेर पडला आहे.

 

अद्वैत कडणे याने ही मालिका सोडली आहे. ईशा बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर त्याचे सर्व रोल संपले होते. तसेच त्याला ‘जाऊ नको दूर तू बाबा’ या मालिकेत काम मिळाले आहे. त्यामुळेच त्याने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून काढता पाय घेतला आहे.

 

अशात या मालिकेत मधुराणी प्रभुलकरही आरुंधती हे मुख्य पात्र साकारते. मधुराणीने या आधी देखील अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपट ती आरजेच्या भूमिकेत दिसली होती. मात्र तिला खरी ओळख आणि प्रसिद्धी याच मालिकेने दिली.

 

मालिकेमध्ये ओंकार गोवर्धन आशुतोष केळकर हे पात्र साकारत आहे. तर मिलिंद गवळी अनिरुद्ध देशमुख, दीपाली पानसरेही रुपाली भोसले हे पात्र साकारते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button