दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची मुलगी दिसते खूप सुंदर; करते हे काम

मुंबई | दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी मराठी सिनेसृष्टी चांगलीच गाजवली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक खलनायकाच्या भूमिका केल्या. मराठी बरोबरच त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर देखील राज्य केले. आज ते आपल्यामध्ये नाहीत मात्र आजही त्यांचे चित्रपट चाहते आवडीने पाहतात.
शेवगाव तालुक्यातील अमरापूर हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील शेती करत. शेत नांगरणे, बैलांना चारा घालणे, मोट चालवणे, गाईचे दूध काढणे, जत्रेत बैल पळविणे या सगळ्या गोष्टी अमरापूरकर यांनी बालपणी केल्या होत्या. त्यांचे मूळचे नाव गणेशकुमार नरवाडे. नाटकांतील भूमिकांसाठी त्यानी सदाशीव अमरापूरकर हे नाव घेतले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी ‘पेटलेली अमावास्या’ या एकांकितेत नायकाची आणि त्यांची पहिली-वहिली भूमिका केली होती.
सामाजिक जाणिवेतून सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या संस्था-संघटानांशीही अमरापूरकरांचा संबंध होता. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे गावोगावी प्रयोग झाले होते. त्या नाटकात सदाशिव अमरापूरकर भूमिका करत असत. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वर्ध्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जात. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर आदी सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही अमरापूरकरांचे जिव्हाळ्याचे नाते होते.
अमरापूरकरांनी श्याम बेनेगल यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या दूरचित्रवाणी मालिकेत महात्मा फुले यांची भूमिका केली होती. अर्धसत्य, आई पाहिजे, आखरी, रास्ता, आँखे, आन्टी नंबर १, इश्क, एलान-ए-जंग, कुली नंबर १, गुप्त, छोटे सरकार, जन्मठेप, झेडपी, नाकाबंद, पैंजण, बाॅम्बे टाॅकीज, २२ जून १८९७, वास्तुपुरुष, सडक, हुकुमत, होऊ दे जरासा उशीर अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. सदाशिव अमरापूरकर यांच्या प्रमाणे त्यांची मुलगी रीमा अमरापूरकर ही देखील मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. ती एक दिग्दर्शक आणि निर्माती आहे.
‘आरे आरे बाबा, आता तरी थांबा’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून तिने पदार्पण केले. या चित्रपटातून तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील प्रसिद्धी मिळाली आहे. गोवा चित्रपट महोत्सवात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा तिचा ‘जननी’ हा लघुपट ; प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवात देखील दाखवला गेला. रीमा सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असते. ती समाजात घडणाऱ्या अनेक घटनांवर भाष्य करते. ती एक निर्भिड महिला आहे.