लता मंगेशकर यांचं ते भाकीत खरं ठरलं; रानु मंडल वर आलीय खुपचं वाईट वेळ

पुणे | गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशन वर राणू मंडल यांनी एक प्यार का नगमा हैं हे गाणं गायलं होतं. एका सोशल मीडिया वापरकर्त्यांने ते गाणं मोबाईल मध्ये शूट करून सोशल मीडियावर प्रसारित केलं आणि रानु या एका रात्रीत स्टार बनल्या, मात्र त्या स्टार फार काळ राहिल्या नाहीत.
एका रात्रीत स्टार झाल्यानंतर त्यांना अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या एवढंच नव्हे तर ज्यांनी ते गाणं गायलं अशा लता मंगेशकर यांनी देखील रानु यांचं कौतुक केलं. त्यामुळे अवघ्या काही काळात त्या एवढ्या प्रकाश झोतात आल्या की त्यांना नेटकऱ्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.
मात्र त्यावेळी लता दीदींनी एक भाकीत केलं होत. दीदी म्हणाल्या होत्या की, कोणाचं अनुकरण करून मिळवलेल यश फार काळ टिकत नाही. अनेकजण बड्या दिग्गजांचे अनुकरण करून प्रकाश झोतात येतात. मात्र पुढे ते टिकत नाही. त्यामुळे पुढे गेल्यावर स्वतः देखील गाणी गायली पाहिजेत.
माझ्या गाण्यांमुळे जर कोणाचं भल होत असेल तर मी माझ भाग्य समजते. असे भाकीत लता दीदींनी केलं होत. त्यामुळे रानु मंडल यांची सध्याची स्थिती पाहता ते खर ठरत असल्याचे दिसत आहे. सध्या त्यांची स्थिती पहिल्या सारखी बनली आहे. त्यांच्या आवाजात खूप दम आहे. मात्र त्यांनी त्याचा स्वतः उपयोग करायला पाहिजे होता. असेही चाहत्यांकडून म्हणण्यात येत आहे.