राजू श्रीवास्तव यांनी व्यक्त केली होती शेवटची इच्छा; वाचून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | जिम मध्ये व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांनी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना दिल्ली मधील एम्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती बिघडत गेल्याने अखेर त्यांचे निधन झाले आहे.
अनेक दिवस ते कोमामध्ये राहिले आणि अखेर त्यांची प्राणज्योत मावळली आहे. राजू श्रीवास्तव हे अत्यंत प्रसिध्द विनोदी कलाकार म्हणून प्रसिध्द होते. स्टेज शो आणि विनोदी कार्यक्रमात भूमिका साकारून ते एक उत्तम कलाकार असल्याचे त्यांनी दाखवून दिलं होत. राजू श्रीवास्तव यांना मिमिक्री करता येत होती.
अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करून ते बॉलीवुड मध्ये प्रसिध्द झाले होते. बॉलीवुड मधील अनेक कलाकार त्यांच्या संपर्कात होते. मात्र अचानक त्यांचे निधन झाल्याने अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ४० दिवस मृत्यू सोबत असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली आहे.
राजू श्रीवास्तव यांचे निधन झाल्यावर त्यांनी सर्वांना रडवल आहे. मात्र त्यांनी जी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. ती पाहून अनेकांना घयवरून आले आहे. MAHARASHTRA TIMES ने दिलेल्या वृत्तानुसार राजू श्रीवास्तव यांनी एक शेवटची इच्छा काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.
ते म्हणाले होते की “ज्यावेळी माझा मृत्यू होईल, त्यावेळी कोणीही रडायचे नाही. सर्वांनी हसत हसत माझ्यावर अंत्संस्कार करायचे” अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र आयुष्यभर जगाला हसविणाऱ्या राजू यांची शेवटची कोणीही पूर्ण करू शकत नाही.
कारण आयुष्यभर त्यांनी जागाच मनोरंजन केलं, आणि त्यांच्या मृत्यूने अख्ख्या जगाला रडवल आहे. राजू यांच्या निधनाने विनोदी अभिनयाच्या एका काळाचा अंत झाल्याचे म्हटले जात आहे. अनेक दिग्गजांनी राजू यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.