आत्ताच्या घडामोडी

कुशल बद्रिकेची पत्नी दिसते खूपचं सुंदर; करतेय ‘हे’ काम

मुंबई | प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. यामध्ये लहान मोठं, पैसा, समृध्दी, रंग अशा सर्व सीमा ओलांडून हे प्रेम होत असत. अशात आजवर आपण अनेक कलारकांच्या रंजक प्रेमकहाणी ऐकल्या असतील. तर आज आपण एका विनोदी कलाकाराची प्रेम कहाणी पाहणार आहोत.

 

चला हवा येऊ द्या या शोने हास्याचा नेहमीच भूकंप आणला आहे. यातील सर्वच शिलेदार ही विनोदाच्या शैलीने सर्वांना नेहमीच हसवत असतात. त्यातीलच एक विनोदी अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. शाळेतली मुलं अतो किंवा मग सुनील शेट्टी सगळ्याच भूमिकांना तो असा काही विनोदी बनवतो की, त्या कलाकाराला पाहिल्यावर आधी कुशलची आठण येते. चला हवा येऊद्याच नव्हे तर, बकुळा नामदेव घोटाळे आणि जत्रा सारख्या अनेक चित्रपटांत त्याने धमाकेदार विनोद केले आहेत. अशात आज या विनोद विराची प्रेम कहाणी जाणून घेऊ.

 

कुशलला लहान पणापासून अभ्यासात तसा बरा नव्हता. शाळेत पेपरवर निळ्या शाईपेक्षा लाला शाईच्या रेघा जास्त असायच्या. लोकांना पाहणे त्यांच्या सारखी नक्कल करणे हे त्याला खूप आवडायचे. त्यामुळे शाळेत असताना एकांकिका आणि नाटकांच्या स्पर्धेत त्याचं नाव पहिले घेतल जायचं. शालेय मंचावर अभिनय करतात करता तो अभियनीतील कोणतही बाळकडू नसताना देखील बरच काही शिकला होता.

 

अशात एकदा एका एकपात्री नाटकात त्याच नाव जबरदस्तीने देण्यात आलं. त्यावेळी त्याला अभिनय करण्याची इच्छा नव्हती. मात्र त्यांच्या मित्रांनी त्याच नाव दिलं होतं. मग काय स्टेजवर गेल्यावर त्याच्यातील तो अभिनय बाहेर आला आणि सर्व जण खळखळून हसले. यावेळी तिथे सूनैना नावाची एक मुलगी देखील आली होती. तिने देखील या सोर्धेत भाग घेतला होता.

 

तिने ती फुलराणीमधील एक सीन सादर केला होता. तिचा अभिनय पाहून कुशल तिच्याकडे पहातच राहिला. त्याला सूनैना खूप आवडली. तसेच पुढे या स्पर्धेत त्याला प्रथम पारितोषिक देखील मिळालं आणि सूनैनाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. पहिल्या भेटीत मुलगी तर आवडली होती. मात्र तिच्या विषयी काहीच माहीत नव्हते. त्यामुळे तो शांत राहिला. मात्र कुशलच्या नशिबाने त्याची आणि सुनैनाची पुन्हा एकदा भेट घडवली. एका नाटकाची त्याला ऑफर मिळाली होती. त्यात सुनैनाची देखील एक भूमिका होती. यावेळी त्या दोघांमध्ये पहिल्यांदा बोलण झाल. नंतर एका नाटकात या दोघांनी पती पत्नीची भूमिका केली होती.

 

हळूहळू दोघांच्या गप्पा आणि भेटी गाठी वाढू लागल्या होत्या. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र कुशल तिला विचारायला आपल्या मनातील ती गोष्ट सांगायला घाबरत होता. कारण सुनैना सुशिक्षित घराण्यातील होती. तिची आई मुख्याध्यापिका आणि बाबा ब्रांच मॅनेजर होते. आता कुशल तर तेव्हा चाळीत राहत होता.

 

घरची परिस्थिती तशी चांगली पण सुनैना समोर थोडी बिकटच होती. त्यामुळं त्याच्या मनात नेहमी न्यूनगंड होता. तिचे बाबा ओरडतील, हे प्रेम पुढे सफल होणार नाही अशी भीती त्याच्या मनात होती. मात्र यावेळी सुनैनाने पुढाकार घेतला आणि कुशलला प्रपोज केलं. यावेळी त्याच हृदय सातव्या आसमंतावर जाऊन पोहोचलं. जी मुलगी आपल्याला आवडते तिने स्वतः च येऊन प्रपोज करण म्हणजे मोठीच गोष्ट.

 

आता प्रेमाची कबुली तर झाली होती. मात्र लग्न पर्यंतचा काळ फार कठीण होता. दोघांना देखील आपल्या आई वडिलांना खूप समजवावे लागले. शेवटी आई बाबांनी देखील लग्नाला परवानगी दिली. थाटामाटात दोघांचं लग्न देखील झालं. आता हे दोघे त्यांच्या सुखी संसारात मग्न आहेत. दोघांना एक मुलगा देखील आहे. तर कुशलची ही प्रेम कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button