आत्ताच्या घडामोडीमराठी सिनेसृष्टी

चला हवा येऊद्या फेम कुशल बद्रिकेला झाली जोरदार मारहाण

मुंबई | सोशल मीडियावर नेहमीच कलाकारांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होतं असतात. यात अनेक कलाकार आपल्या कामामुळे तर काही जण कामात माती खाल्ल्यामुळे चर्चेत येतात. अभिनेता कुशल बद्रिके देखील अशाच पद्धतीने कामात माती खाल्याने चर्चेत आला आहे. महत्वाचं म्हणजे त्याला या वेळी तीन जणांनी मारहाण केली आहे.

 

कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतो. चला हवा येऊ द्या या शो मुळे त्याने अनेकांच्या ह्रुदयात आपले स्थान पक्के केले आहे. अशात आता सोशल मीडियावर त्याने स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

 

या व्हिडिओमध्ये कुशल, विजू माने, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर आहेत. हे सर्व जण एका कारमध्ये आहेत. कार सुरू झाल्यावर हातात एक स्क्रिप्ट घेऊन कुशल ती स्क्रिप्ट वाचत आहे. यातील काही भाग वाचून झाल्यावर त्याचे बाकीचे सगळे मित्र त्याला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. कुशलने हा गमतीशीर व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे की, ” नेमकं का मारलं हे समजलंच नाही.” आता त्याचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होतं आहे. अनेक जण त्याला यावर हसायचे ईमोजी पाठवत आहेत. तसेच त्याचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.

 

कुशलचा हा व्हिडिओ स्ट्रगलर साला या सिरीजमधील आहे. या सिरिजचे नवीन तिसरे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. या आधी देखील ही सिरीज कमालीची गाजली आहे. यामध्ये विजू माने यांचे दिग्दर्शन आहे. एक कलाकार आणि त्याच्या आयुष्यातील स्ट्रगल कसे असते. तसेच या काळात त्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टी या सिरीजमध्ये आहेत. तसेच मित्र आणि त्यांच्यातील चावट गप्पा, एकमेकांबरोबर शिव्या देत बोलण्याची सवय यात दाखवली आहे.

 

सिरीजमध्ये या आधी अनेक कलाकारांनी आपली व्यथा मांडली आहे. आता देखील अनेक नवनवीन कलाकार यात आलेले दिसणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच या सिरिजच्या तिसऱ्या सिरीजचा पाहिला एपिसोड रिलीज झाला आहे. याच्याच प्रमोशन साठी कुशलने आपल्याला मस्तीत मित्रांनी मारलेला व्हिडिओ पोस्ट केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button