‘कोई मिल गया’ फेम अभिनेत्याचे निधन; भारतीय चित्रपट सृष्टीवर शोककळा

मुंबई | लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहिरी, केके यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत आणखी देखील शोक व्यक्त केला जात आहे. अवघ्या काही कालावधीत अभिनय क्षेत्रातील तारे देवा घरी गेल्याने चाहत्यांना मोठा दुःखाचा सामना करावा लागत आहे.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर तर जगावर शोककळा पसरली होती. आज देखील अशा एका दिग्गज कलाकाराच्या निधनाने अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. कोई मिल गया या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्याचे निधन झाले आहे.
कोई मिल गया हा चित्रपट अत्यंत प्रसिध्द झाला होता. तो अल्पावधीत सर्व रेकॉर्ड तोडून गेला होता. अशे फार कमी लोक असतील ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही. हा चित्रपट अलियन वर दाखविला होता. त्यामुळे या चित्रपटाने अल्प काळात मोठी कमाई केली होती.
सध्या या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. चित्रपटात भूमिकेत असलेल्या दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले आहे. अभिनेते मिथीलेश चतुर्वेदी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे.
मिथीलेश यांना गेल्या काही दिवसांपूर्वी हृदय विकाराचा झटका येऊन गेला होता. त्यातून ते कसेबसे सावरले होते. तसेच गेल्या काही वर्षांपासून त्यांना हृदयाच्या संध्रभातील काही आजार होते. त्यामुळे अचानक त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी क्रेझी 4 या चित्रपटात देखील भूमिका साकारली होती.