आत्ताच्या घडामोडी

KGF फेम यशची बहीण दिसते खूपच सुंदर; करते हे काम

दिल्ली | केजीएफ या चित्रपटाने टॉलीवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. हा चित्रपट बॉलीवूडमध्ये देखील भन्नाट गाजला. या चित्रपटामध्ये मुख्य पात्र यशने साकारले. या चित्रपटाच्या प्रसिद्धीमुळे तो देखील खूप प्रसिद्ध झाला. त्याच्या आयुष्यातील अनेक खाजगी गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक राहू लागले. अशात यश हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी तो इथे शेअर करतो.

 

त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या कुटुंबीयांचे अनेक फोटो आहेत. सध्या सोशल मीडियावर यातीलच एक फोटो तुफान वायरल होत आहे. या फोटोमध्ये एक मुलगी त्याच्या बाजूला उभी राहिलेली आहे. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून यशची बहिण आहे. त्याची बहीण दिसायला खूपच सुंदर आहे. अनेक बॉलीवूड अभिनेत्रींना मागे टाकेल एवढी तिची सुंदरता आहे.

 

यशच्या बहिणीचे नाव नंदिनी आहे. नंदिनी आणि यशचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो रक्षाबंधन या सणाचे असल्याचे समजत आहे. यावेळी यशने काळ्या रंगाचे टी-शर्ट घातले असून त्यावर केशरी रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. तसेच त्याच्या बहिणीने यामध्ये लेवेंडर रंगाचा ड्रेस घातला आहे. केसांचा बॉबकट करून तिने सुंदर हेअर स्टाईल केली आहे. एका फोटो ती यशला राखी बांधताना दिसत आहे तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ती त्याचे औक्षण करताना दिसत आहे.

 

KGF या चित्रपटामधून यशने खूप मोठे यश संपादन केले आहे. त्याने मिळवलेल्या प्रसिद्धीमध्ये त्याच्या बहिणीने देखील त्याला खूप मदत केली असे तो म्हणतो. त्याची बहीण सोशल मीडियावर खूप कमी सक्रीय असते. तसेच ती अभिनय क्षेत्रापासून खूप दूर आहे. तिचे सोशल मीडियावरील अकाउंट देखील प्रायव्हेट आहे. बॉलीवूडची लाईमलाईट आणि झगमग तिला अजिबात आवडत नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button