केदार शिंदे यांची मुलगी दिसते खुपचं सुंदर; करते हे काम

पुणे | मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज निर्माते आणि दिग्दर्शक केदार शिंदे हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. शाहीर साबळे यांचे नातू असलेले केदार शिंदे हे आता आपल्या आजोबांच्या जीवनावर एक चित्रपट बनवणार आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटामधून त्यांची मुलगी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.
त्यांच्या मुलीला आतापर्यंत कोणीही पाहिले नव्हते. त्यामुळे अचानक आता ती सोशल मीडियावर वायरल झाली आहे. केदार शिंदे यांनी स्वतः त्यांच्या मुलीचा चित्रपटातील फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे. साल 2023 मध्ये केदार शिंदे दिग्दर्शित “महाराष्ट्र शाहीर” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहीर साबळे यांनी या मराठी मनोरंजन विश्वासाठी मोलाचे साहित्य दिलेले आहे. त्यांच्या साहित्याची फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात महती आहे. आता त्यांच्याच जीवनावर आधारित त्यांचे नातू चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर सर्वांनाच या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न पडला होता.
त्यानंतर काही दिवसांनी केदार शिंदे यांनी चित्रपटाचा पहिला पोस्टर समोर आणला. यामध्ये अंकुश चौधरीचा फोटो मोठ्या बॅनरवर पाहायला मिळाला. अंकुश चौधरी हा अभिनेता शाहीर साबळे यांचे पात्र साकारत आहे. अंकुशने आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. मात्र शाहीर साबळे सारखे चरित्र साकारताना त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. तसेच केदार शिंदे यांनी आपल्या मुलीचा फोटो देखील शेअर केला आहे. शाहीर साबळे यांच्या पत्नी भानुमती यांची भूमिका केदार शिंदे यांची मुलगी साकारणार आहे. शाहिरांच्या आयुष्यातलं गोड गाणं…. भानुमती असं त्यांनी यामध्ये लिहिल आहे.
केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे ही भानुमती यांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेबद्दल माहिती देताना केदार शिंदे यांनी लिहिले की, “आज ३ सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं….. सौ. भानुमती कृष्णराव साबळे आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती ‘सना केदार शिंदे’.”
तसेच याविषयी आणखीन माहिती देताना त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ” सना शिंदे तिच्या पणजीच्या भूमिकेत पणती. शाहीरांचा हा झंझावाती जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर सादर करताना केदार शिंदे प्रोडक्शन सोबत आता आहे मराठी चित्रपट क्षेत्रातील महत्वाचं नाव ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट!!’ पुढच्या वर्षी २८ एप्रिल रोजी पुन्हा गर्जणार महाराष्ट्राच्या थिएटर्समध्ये अजय-अतुलचे सुमधुर संगीत!! महाराष्ट्र शाहीर, २८ एप्रिल २०२३ जय महाराष्ट्र! ” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सना शिंदे ही प्रथमच अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. या आधी तिने आपल्या वडिलांबरोबर प्रोडूसर म्हणून काम केले आहे. आता आपल्या पणजीची भूमिका ती कशा पद्धतीने साकारेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच अंकुश चौधरी देखील शाहीर साबळे यांच्या भूमिकेला किती न्याय देतो हे पाहणे ही महत्त्वाचे असेल. चित्रपटातील दोन्हीही प्रमुख पात्रांची घोषणा झाल्यानंतर आता प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता अतिशय शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षक लवकरात लवकर या चित्रपटाचा ट्रेलर समोर येण्याची वाट पाहत आहे.