KBC | एकाही स्पर्धकाला देता आले नाही या सोप्या प्रश्नाचे उत्तर; तुम्हाला येतंय का?

मुंबई | बिग बी होस्ट करत असलेल्या केबीसीमध्ये एकदा तरी हॉट सिटवर बसण्याची संधी मिळावी यासाठी अनेक व्यक्ती अभ्यास करून येथे येतात. इथे आल्यावर रॅपिड राऊंडमध्ये जो जिंकतो त्याला कोटींच्या घरात खेळण्यासाठी हॉट सिटवर बसण्याची संधी मिळते.
या शो मध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती भरपूर अभ्यास करून आलेली असते. मात्र घाईत आणि उत्साहात अनेक व्यक्ती चुकीच्या पद्धतीने उत्तरे देतात आणि त्यांची उत्तरे देखील चुकीची निघतात. नुकताच कौन बानेगा करोडपतीच्या एका भागात हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. या शोचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतं आहे. यात आपल्या भारताशी निगडित एक प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र याचे उत्तर कुणालाच देता आले नाही.
मुळात रॅपिड फायर मधील या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. कुणालाच याचे उत्तर नव्हते. ज्यावेळी अमिताभ बच्चन यांनी या प्रश्नाचा निकाल पाहिला तेव्हा त्यांना धक्काच बसला कारण हा प्रश्न कुणीच सोडवला नव्हता. बिग बींना वाटले की, चुकीचे उत्तर लोकांनी दिले असेल मात्र त्याचे कुणी उत्तरच दिले नव्हते. त्यामुळे बिग बी हसत म्हणले ” तुम्ही सगळे भारतातच राहताय ना…?
बिग बींचा हा सोपा प्रश्न पुढील प्रमाणे होता.
• यापैकी कोणते ठिकाण नवी दिल्लीपासून सर्वात लांब आहे?
1 बंगळुरू
2 पुणे
3 हैदराबाद
4 भुवनेश्वर
याचे अचूक उत्तर 1 बंगळुरू होते. मात्र कुणालाच हे माहीत नव्हते. आता शो मधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उत्तर माहीत असून देखील गोंधळून गेल्याने काय होते हे यात दिसत आहे.