कतरीना कैफ आणि शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी अत्यंत दुःखत घटना; जे नको ते घडलं

मुंबई | कोरोनाच्या महामारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. आणि यावेळी पहिला हल्ला बॉलिवूड कलाकारांवर चढवला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या ते कॉरंटाईन आहेत. या बातमीतून कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या कलाकारांची माहिती घेऊ.

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि विकी कौशलची पत्नी कॅटरीना कैफला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ती कॉरंटाईन आहे. मात्र तिचा हा कालावधी आता संपत आला आहे. कोरोनाची लागण झाल्याने ती “आयफा” पुरस्कार सोहळ्यात देखील येऊ शकली नाही.

अभिनेता विकी कौशलने तिला कोरोना झाल्याचे सांगितले होते. आयफा पुरस्कार सोहळ्यात विकी एकटाच आला होता. सरदार उधम या चित्रपटासाठी त्याला “आयफा” पुरस्कार देखील मिळाला. त्यावेळी त्याच्याबरोबर कॅटरीना दिसली नाही. त्यामुळे अनेकांनी त्याला प्रश्न विचारले असता. त्याने तिला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. “ती हे सर्व खूप मिस करत आहेत.” असं ही तो यावेळी म्हणाला.

कॅटरीनासह बॉलिवूडच्या किंग खानचा कोरोना अहवाल देखील सकारात्मक आला आहे. कारण जोहरच्या वाढदिवशी झालेल्या पार्टीमध्ये शाहरुख दिसला होता. तिथेच त्याला कोरोनाची लागण झाल्याचा दावा केला जातं आहे.

बॉलिवूडच्या या दोन कलाकारांसह अभिनेता कार्तिक आर्यन देखील कोविड पॉझिटिव आला आहे. नुकताच त्याचा ‘भूलभुलैया २’ प्रसर्शित झाला आहे. यासाठी तो जोरदार प्रमोशनला लागला होता. यामध्येच त्याला कोरोनाची लागण झाली.

कार्तिक आयफा पुरस्कार सोहळ्यात देखील एक धमाकेदार डान्स सादर करणार होता. पण यामुळे त्याला आपला डान्स रद्द करावा लागला. कार्तिकने त्याला कोरोना झाल्याची माहिती इंस्टाग्राम पोस्टमधून दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, ” सर्व काही छान सुरू आलेलं कोवीडला पाहवत नाही.”

बृहन्मुंबई महानरपालिकेने शनिवारी कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये दररोज वाढ होत असताना शहराला सतर्क राहण्यास सांगितले आहे. BMC च्या ट्विटर हँडलवर, त्यांनी लिहिले आहे की, “मुंबईमध्ये वाढत्या कोविड -19 प्रकरणांमुळे आणि चौथ्या लाटेच्या शक्यतेमुळे, सर्व लॅब आणि रुग्णालयांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. आम्ही सर्वांना मास्क घालण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करतो.”

मुंबईत कोविड-19 रुग्णांची वाढती संख्या पाहता, बीएमसीने शहरातील चित्रपट स्टुडिओसाठी नवीन सूचना जाहीर केल्या आहेत. कोणीही स्टुडिओमध्ये कोणताच कार्यक्रम आयोजित करू नये. आणि केल्यास आधी BMC ला सुचना द्याव्यात. असे त्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button