प्लास्टिक सर्जरी करणं अभिनेत्रीला पडलं महागात, फुफुसात पाणी साचल्याने लोकप्रिय अभिनेत्रीचां मृत्यू

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांचे निधन झाले आहे. त्यात लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लाहिरी या सारख्या दिग्गज कलावंताची नावे या यादीत आहेत. 2022 हे वर्ष चित्रपट सृष्टीतील कलाकारांसाठी धोक्याच मानलं जात आहे.

 

अनेक कलाकारांचे निधन झाल्याने चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. आज देखील एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. कन्नडा अभिनेत्री चेतना राज हीचे निधन झाले आहे. वजन कमी करण्यासाठी सर्जरी करत असताना तिचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे.

 

चेतना राज ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. अवघ्या 21व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला आहे. सोमवारी तिला फॅट फ्री शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अचानक तिची तब्येत बिघडली.

 

तिच्या फुफुसामध्ये पाणी साचले आणि तिचा मृत्यू झाला आहे. तिच्यावर बंगळूर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चेतनाच्या पालकांनी रुग्णालयावर तक्रार दिली आहे. रुग्णालयावर जवळच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रुग्णालयीन प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचे पालकांनी म्हटले आहे. मात्र वजन कमी करण्यासाठी सर्जरी करणं धोक्याच आहे. त्यामुळे जीव जाऊ शकतो. असेही या प्रकरणातून पाहायला मिळत आहे. सध्या चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button