Kanda Bajarbhav: कांद्याचे दर गगनाला भिडणार; 60 रुपयांपर्यंत कांदा विकणार, वाचा काय म्हणतात तज्ञ?

Kanda Bajarbhav 2022 | दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी राजा सध्या नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या कांद्याचे दर उच्चांकी गाठत आहेत. त्यामुळे शेतकरी थोड्या प्रमाणात सुखावला आहे. पण बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांचां कांदा या अतिवृष्टीमुळे वाचला आहे. (Kanda Bajarbhav)

Join WhatsApp Group

 

त्यामुळे बाजार समितीत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मात्र कांद्याचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. सध्या 30 रुपये प्रति किलो पर्यंत कांद्याचे भाव सुरू आहेत. सरासरी 20 रुपये दर प्रति किलो कांद्याला मिळत आहे. मात्र ते हळूहळू वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 

येत्या काळात कांद्याच्या दरात आणखी तेजी पाहायला मिळेल असे तज्ञ सांगत आहेत. कारण शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा मार्केट मध्ये आणला आहे. त्यामुळे त्यांच्या जवळ असलेला सर्व कांदा संपला आहे. तसेच काढणीला आलेला कांदा अतिवृष्टी मुळे उध्वस्त झाला आहे. त्यातील थोड्या प्रमाणात राहिलेला कांदा देखील शेतकऱ्यांनी बाजार समितीत आणला आहे. (Kanda Bajarbhav)

 

त्यामुळे सध्या कांदा संपत आला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात कांद्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळणार आहे. सध्या कांदा 30 रुपयांपर्यंत सुरू आहे. येत्या काही महिन्यात हाच कांदा 60 रुपये प्रति किलो या भावात जाईल. असे तज्ञ सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी राजा सुखावणारं आहे. मात्र शेतकऱ्यांकडे कांदा नसल्यामुळे त्यांना या भाववाढीचा जास्त फायदा होणार नाही. नवीन वर्ष शेतकऱ्यांसाठी गोड जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button