Kanda Bajarbhav: कांद्याचे दर घसरले, वाचा आजचे दरपत्रक – 22 नोव्हेंबर 2022
Today Onion Rate In Maharashtra - 22 November 2022

Kanda Bajarbhav | गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्ण मोडून जाण्याची वेळ आली होती. मात्र काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा थोडाफार कांदा यातून वाचला होता. तसेच काही शेतकऱ्यांनी कांद्याची योग्य साठवणूक केली होती. (Kanda Bajarbhav)
यामुळे थोडाफार कांदा या अतिवृष्टी मधून वाचला आहे. आज आम्ही तुम्हाला 22 नोव्हेंबर, मंगळवारी राज्यातील विविध बाजार पेठेत कांद्याची झालेली विक्री म्हणजेच दरपत्रक सांगणार आहोत. आज सर्वात जास्त दर हा कामठी बाजार समितीत मिळाला आहे. मात्र त्याठिकाणी फक्त 2 क्विंटल एवढीच आवक होती. कामठी मध्ये 3 हजार रुपये दर मिळाला आहे. तर सर्वात कमी दर हा कल्याण बाजार पेठेत मिळाला आहे. 700 रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर मिळाला आहे.
आज जाहीर झालेले दर शेतकऱ्यांना निराशा देणारे आहेत. कारण कांद्याची आवक कमी होत असल्याने दर वाढण्याच्या ऐवजी कमी होत चालल्याचे चित्र यात पाहायला मिळत आहेत. आज सर्वच बाजार पेठेत दर शिथिल पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे बळीराजा थोडा नाराज पाहायला मिळाला आहे. चला आज महाराष्ट्रतील बाजार पेठेतील आजचा दर पाहुयात. (Kanda Bajarbhav 22 November 2022)
वाचा आजचे राज्यातील प्रमुख बाजार पेठेतील दरपत्रक (today Onion rate in Maharashtra – 22 November 2022)
-
- कोल्हापूर – 700 ते 1700 क्विंटल
- औरंगाबाद – 170 ते 1300 क्विंटल
- सातारा – 800 ते 1600 क्विंटल
- सोलापूर – 100 ते 2200 क्विंटल
- जळगाव – 300 ते 800 क्विंटल
- नागपुर – 900 ते 1400 क्विंटल
- अमरावती – 100 ते 900 क्विंटल
- कामठी – 2000 ते 3000 क्विंटल
- येवला – 225 ते 1625 क्विंटल
- लासलगाव – 500 ते 1591 क्विंटल
- चाळीसगाव – 200 ते 1145 क्विंटल