Kanda Bajarbhav: कांद्याच्या दरात वाढ, मात्र तरीही शेतकरी अडचणीत, वाचा सविस्तर

Kanada BajarBhav | सध्या दिवसेंदिवस कांद्याच्या दरात चांगली वाढ होत आहे. यामुळे उत्पादक शेतकरी सुखावला आहे. मात्र प्रत्येकच शेतकऱ्याला या भाव वाढीचा फायदा होतोय असे नाही. कारण वाढत असलेल्या भाव वाढी पासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे कांद्याच्या वाढत्या दराचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसल्याचे दिसत आहे.

 

रब्बी आणि उन्हाळी कांदा शेतकऱ्यांनी भाव वाढेल या आशेने साठवून ठेवला होता. मात्र अतिवृष्टी झाली आणि साठवून ठेवलेला कांदा पूर्णपणे नासून गेला. आणि यातच शेतकरी अडचणीत सापडला. दरवर्षी च्या तुलनेत या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे. तसेच अतिवृष्टी देखील झाली आहे. त्यामुळे पिकविलेला आणि साठविलेला कांदा पूर्णपणे नासून गेला आहे.

Advertisement

 

त्यामुळे बाजार पेठेत फार कमी कांदा येत आहे. आणि यामुळे दरात देखील चांगलीच वाढ होत आहे. बागायती भागातील अनेक शेतकरी कांद्याची लागवड करून चांगले उत्पन्न घेत आहेत. मात्र यावर्षी शेतकऱ्यांच्या नशिबाला निराशा आल्याचे दिसत आहे. कांद्याला खर्च करून देखील, हाता तोंडाशी आलेला घास मेघराजाणे हिसकावून घेतला आहे.

Advertisement

 

येत्या काळात देखील कांद्याच्या दरात अजून तेजी पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र उत्पादक शेतकऱ्यांना याचा जास्त फायदा होईल की नाही हे देखील सांगता येत नाही. फार कमी शेतकऱ्यांकडे कांदा आहे. त्यामुळे अशा मुबलक शेतकऱ्यांचे सोने होईल हे नक्की.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *