Kanda Bajarbhav: या बाजार समितीत कांद्याला मिळाला विक्रमी दर
राज्यातील एका बाजार समितीत कांद्याला 30 रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे.

Kanda Bajarbhav | 29 नोव्हेंबर रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात खूपच शिथिलता पाहायला मिळाली. कांद्याचे दर कमी पाहायला मिळाले. मात्र राज्यातील एका बाजार पेठेत कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्या बाजार पेठेकडे कांदा विकण्यासाठी घेऊन जाऊ लागला आहे. आवक जास्त असून देखील कांद्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. (Kanda Bajarbhav)
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात शिथिलता पाहायला मिळतं आहे. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत पडला आहे. दर कमी मिळत असल्याने शेतकरी बाजार पेठेकडे पाठ फिरवू लागला आहे. मध्य प्रदेशातील कांद्याची आयात वाढली आहे. आणि दक्षिण भारतातील बाजार पेठेत विक्री होत आहे. यामुळे महाराष्ट्रातील बाजार समितीत सध्या शिथिलता पाहायला मिळत आहे. (Kanda Bajar bhav)
दर वाढले आणि अचानक घसराल्याने शेतकरी चांगलाच चिंतेत पडला होता. मात्र दर वाढतील अशी आशा अजून देखील शेतकऱ्यांना लागली आहे. 35 रुपयांपर्यंत गेलेले दर पुन्हा 20 रुपयांवर आले आहेत. मात्र 29 नोव्हेंबर रोजी राज्यातील कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला रेकॉर्डब्रेक दर मिळाला आहे. जास्तीत जास्त 3000 रुपये प्रति क्विंटल असा दर कांद्याला मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दर वाढतील आशी आशा लागली आहे.