Kanda Bajarbhav: या कारणामुळे कांद्याच्या दरात होतेय घसरण

Kanda Bajarbhav | गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढत होते. त्यामुळे उत्पादक शेतकरी चांगलाच सुखावला होता. मात्र अचानक दर घसरल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. कारण शेतकऱ्यांपुढे हे एक मोठं संकट येऊन उभारला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे शेतकऱ्याने लावलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. (Kanda Bajar bhav – 25 November 2022)

 

काढणीला आलेला कांदा मेघराजाने पूर्ण उध्वस्त करून टाकला होता. त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला होता. सध्या देखील शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढू लागली आहे. कारण कांद्याच्या दरात पुन्हा घसरण होऊ लागली आहे. गेल्या काही आठवड्यात कांदा 35 रुपये किलो पर्यंत विकला जात होता. त्यामुळे दर वाढतील अशी शक्यता शेतकऱ्यांना होती. मात्र त्याउलट झाले आहे. (Kanda Bajar bhav)

Advertisement

 

आता कांद्याचे दर पुन्हा पडू लागले आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर मोठ्या अडचणी येऊन उभारल्या आहेत. शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे. दर वाढेल म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली आहे. मात्र दर पुन्हा घसरत असल्याने शेतकऱ्यांना काय करावं ते कळत नाही. आणि शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.

Advertisement

 

तज्ज्ञांच्या मता नुसार मध्य प्रदेशात आता खूप मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. आणि त्यांचा कांदा सध्या उत्तर भारतातील मोठ्या बाजार पेठेत विक्री होत आहे. मध्य प्रदेशातील कांद्याची आवक वाढल्याने महाराष्ट्रातील कांद्याचे दर कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. येत्या काळात दर वाढतील का नाही? हा काळच ठरवेल असे सांगितले जात आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *