लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यात आलियाने केली रणबीरची तक्रार; म्हणाली तो माझे दोन्ही….

मुंबई | आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना बॉलीवुडचे क्युटेस्ट कपल म्हणून ओळखले जाते. या दोघांच्या प्रेम कहाणी नंतर आता त्यांच्या बाळाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रेग्नेंट असलेल्या महिलेची नेहमीच अधिक काळजी घ्यावी लागते. मात्र आलियाने आपल्या पती बद्दल एक मोठी तक्रार केली आहे.
तिची तक्रार ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. नुकतीच आलिया तिच्या डार्लिंग्स या चित्रपटाचे शुटींग पूर्ण करून भारतात आली. यावेळी तिला घेण्यासाठी रणबीर स्वतः एअरपोर्टवर गेला होता. आता ती तिच्या या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसते आहे. यासाठी ती अनेक शो आणि समारंभात हजेरी लावत आहे
.
याच दरम्यान तिने आपल्या पती बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तिने म्हटल आहे की, रणबीर माझी काळजी घेतो हे दाखवण्यासाठी तो माझ्यासाठी खूप काय काय करतो. मात्र तो माझे पाय दाबत नाही अशी तिने तक्रार केली आहे. रणवीरची तिने केलेली तक्रार ऐकून सगळेच जण चकित झाले आहेत. हाच प्रश्न तिला आणखीन एका शोमध्ये देखील विचारला गेला होता.
यावेळी तिला विचारण्यात आले होते की, रणबीर तुझी अधिक काळजी घेतो का? त्यावर ती म्हणाली होती की, तो मला स्पेशल वाटावे या साठी खूप काही करत असतो, पण तो माझे पाय कधीच दाबून देत नाही. याचा मला राग येतो. बाकी तो माझ्यासाठी जेव्हढे महत्व द्यायला पाहिजे माझी जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेव्हढी घेत असतो.
आलिया आणि रणबीरने एप्रिल महिन्यात लग्न केले. या दोघांच्या लग्नाला फक्त घरातील काही मोजकी मंडळी उपस्थित होती. त्या नंतर जून महिन्यात आलियाने ती आई होणार असल्याची गोड बातमी सगळ्यांना दिली. त्यामुळे ती आणि सर्व चाहते खूप खुश आहेत. लवकरच कपूर कुटुंबात आणखीन एक क्यूट कपूर दाखल होणार आहे.