जुही चावलाची मुलगी दिसते खूपच सुंदर; करते हे काम…

मुंबई | जुही चावलाने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट गाजवले. तिने बॉलीवूडमधील अनेक मोठ मोठ्या अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. तिची मुलगी जान्हवी मेहता ही देखील दिसायला खूप सुदंर आहे. मात्र ती अभिनय क्षेत्रापासून खूप दूर आहे. तिला अभिनय नाही तर क्रिकेटमध्ये खूप रस आहे. तिला क्रिकेट खूप आवडते. जान्हवी ही दिसायला अगदी जुही चावला सारखी आहे. तिचा लूक पूर्ण पणे आईवर आहे.

 

जुही चावला ही एक तिच्या काळातील मोठी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. आजही अनेक चाहते तिचे चित्रपट आवडीने पाहतात. चित्रपटातील कारकिर्दी नंतर अभिनेत्रीने लग्न विवाहात अडकण्याचा निर्णय घेतला.

 

जुही चावलाने उद्योजक जय मेहता याच्याशी लग्न केले. त्यानंतर जय आणि जुही या दोघांना दोन मुलं झाली. जुही चावलाच्या मुलाचे नाव अर्जुन मेहता असं आहे. तर मुलीचं नाव जान्हवी मेहता असं आहे. जान्हवी मेहताला क्रिकेट बरोबरच वाचनाची देखील खूप आवड आहे. तिच्या आवडी बद्दल जुही चावला नेहमी सांगत असते.

 

जान्हवी लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये खूप उत्साही आहे. ती लहानपणापासूनच क्रिकेट पाहायची. तिला अभिनय क्षेत्र फार आवडत नाही. त्यामुळे तिने आपल्या आई पेक्षा कोणत्यातरी एका वेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमावण्याचा निर्णय घेतला आहे. जान्हवी जेव्हा लहान होती तेव्हाच तिने क्रिकेट पाहून त्यातील वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रत्यन केला.

 

काही काळापूर्वी जान्हवी मेहता आर्यन खान बरोबर आयपीएल लिलावात दिसली होती. त्यावेळी आर्यन आणि जान्हवी या दोघांची मोठी चर्चा रंगली होती. अशात अभिनेत्री जुही चावला देखील कोलकत्ता नाईट रायडर्स संघाचा एक भाग होती. अशात जान्हवी आता सध्या परदेशात आहे. ती तिथे तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. जान्हवी मनोरंजन क्षेत्रात सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तसेच ती खूप ग्लॅमरस आयुष्य जगते.

 

जुही चावलाही तिच्या दोन्ही मुलांच्या बाबतीत खूप सौम्य आहे. ती नेहमी तिच्या मुलांच्या बाजूने विचार करते. आपल्या मुलांना कधीच कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स नाही केला पाहिजे असे तिला वाटते. तसेच आपल्या दोन्ही मुलांच्या करिअर साठी देखील तिने सर्व निर्णय त्यांच्यावर सोपवले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button